उज्जैन : पूर्व जीवनात क्रांतीकारक असलेले योगी अरविंद हे श्रीकृष्णाच्या दृष्टांतानंतर साधनेकडे वळले. साधनेमुळे भारताच्या अधोगतीच्या मागील कारणे सूक्ष्म स्तरावरील असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी साधनेच्या बळावर भारताच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न केले. भारताच्या उन्नतीसाठी त्यांनी सूक्ष्मातून लढा दिला. त्याचप्रमाणे आताच्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यासारखे संतही सूक्ष्मातून लढा देत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘श्री अरविंदो सोसायटी’च्या शाखेत झालेल्या कार्यक्रमात केले. या प्रसंगी उज्जैन शाखेचे अध्यक्ष श्री. विभाष उपाध्याय, श्री. मधुसूदन श्रीवास्तव आणि श्री. साबरमल स्वामीजी यांनी ‘श्री अरविंद योग शक्ती पीठा’चे चित्र असलेली प्रतिमा देऊन पू. डॉ. पिंगळे यांचा सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात