कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा यांना पायदळी तुडवले जाते, त्यावर बंदी घालण्यात येते, हे नवीन राहिलेले नाही. काँग्रेसच्या राज्यात अशा शाळांवर कारवाई होणे अशक्य होते; मात्र आताच्या केंद्र सरकारने याविषयी कठोर कायदा बनवून या प्रथा आणि परंपरा यांचे रक्षण केले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रामेश्वरम् (तमिळनाडू) : ज्या तीर्थक्षेत्री श्रीरामाने लंकेवर स्वारी करण्याआधी समुद्रसेतू बांधण्यासाठी भगवान शिवाची आराधना केली, त्या रामेश्वरम् येथील सेंट जोसेफ या कॉन्व्हेंट शाळेतील २ विद्यार्थी शबरीमाला यात्रेसाठी जाण्याची सिद्धता करत असतांना त्यांनी कपाळाला विभूती लावून शाळेत प्रवेश केला म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
या कृतीविरुद्ध विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे धाव घेतली तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांनी शिस्तभंग करून अस्वीकारार्ह कृती केल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली, असे कारण देण्यात आले. (हिंदूंवर होणार्या अशा आघातांविषयी पालकांनी आवाज उठवणे एवढ्यावरच न थांबता त्यांच्या पाल्यांना अशा कॉन्व्हेंट शाळांतून काढून घेतले पाहिजे; तरच शाळा व्यवस्थापनांना धडा मिळेल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात