सुरक्षेच्या कारणास्तव ९३ टक्के मुसलमान वस्ती असणार्या देशात बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, तर अन्य देशांत का नाही ?
रबत (मोरक्को) : आफ्रिका खंडाच्या उत्तरेत असलेल्या मोरक्को या देशाने बुरखा बनवणे आणि घालणे यावर बंदी घातली आहे. यासाठी सुरक्षेचे कारण देण्यात आले आहे. अद्याप सरकारकडून अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आलेली नाही; मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या आठवड्यापासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. एका वृत्तसंकेतस्थळाने येथील गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आम्ही बुरखा बनवणे, त्याची आयात करणे आणि त्याची विक्री करणे यांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हिजाब आणि स्कार्फ यांवर बंदी घालण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात