संस्कृतीहीन कार्यक्रमाची तिकिटे न खरेदी करण्याचे आवाहन करणार्या मुंबई महापालिकेचे अभिनंदन ! हा कार्यक्रम रहित होण्यासाठी पालिका प्रशासनासोबत हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : १३ जानेवारी २०१७ या दिवशी सनबर्न इव्हेंट या कार्यक्रमाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी महापालिकेने प्रसिद्धीपत्रक काढून या कार्यक्रमाची तिकिटे खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, या कार्यक्रमाचे अनधिकृतरित्या आयोजन केल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेची अनुमती घेतलेली नाही. तरी नागरिकांनी या अनधिकृतरित्या आयोजित कार्यक्रमाची तिकिटे घेऊ नयेत. (मुंबई येथील पालिका प्रशासन संस्कृतीहीन सनबर्नला विरोध करते, त्याप्रमाणे केसनंद येथे झालेल्या सनबर्नला पुणे जिल्हा प्रशासनाने विरोध का केला नाही, याचाही शोध घेणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात