हिंदू जनजागृती समिती आणि राष्ट्रप्रेमींच्या संघटित विरोधाचा परिणाम !
अॅमेझॉन अमेरिकेसाठीच्या संकेतस्थळावर ‘चुक्का कॅनव्हास शूज’ विक्रीसाठी ठेवले होते. याची विक्री लॉस एँजिलिसस्थित एन. वाय. एल. ए. कंपनी अॅमेझॉनवर करत होती. या दोन्ही वस्तूंवर तिरंग्याचा वापर करण्यात आला होता. याची माहिती मिळताच राष्ट्रप्रेमी नागरीक आणि हिंदु जनजागृती समितीने अॅमेझॉन च्या विरोधात अभियान सुरु केले त्यानंतर ब-याच राष्ट्रप्रेमींनी अॅमेझॉनला विरोध करायला सुरूवात केली. याचा परिणाम, अॅमेझॉन ने तिरंगा असणारे बूट संकेतस्थाळावरुन काढले. या यशाबद्दल भारतमातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करुया.
१३ जानेवारी २०१६
अॅमेझॉनच्या अमेरिकन संकेतस्थळावर तिरंग्याचा अपमान सुरूच
नवी देहली : परराष्ट्र सुषमा स्वराज यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अॅमेझॉनने त्यांच्या संकेतस्थळावरुन भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी काढून घेतली आहे. मात्र अॅमेझॉनच्या अमेरिकन संकेतस्थळावरुन भारतीय तिरंग्याचा अपमान सुरूच आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी अनेक उत्पादने अॅमेझॉन आणि इतर कंपन्यांकडून संकेतस्थळांवर विकली जात आहेत.
https://www.amazon.com/Indian-Womens-Chukka-Canvas-Shoes/dp/B01GFV7RBM
अॅमेझॉनच्या अमेरिकेसाठीच्या संकेतस्थळावर ‘चुक्का कॅनव्हास शूज’ विकले जात आहेत. या शूजची किंमत ४३.९९ अमेरिकन डॉलर (तीन हजार रुपये) आहे. तर शू लेस ऍक्सेसरीजची किंमत ४.४९ अमेरिकन डॉलर (तीनशे रुपये) आहे. लॉस एँजिलिसस्थित एन. वाय. एल. ए. कंपनी या दोन वस्तूंची विक्री अॅमेझॉनवर करते आहे. या दोन्ही वस्तूंवर तिरंग्याचा वापर करण्यात आला आहे.
http://www.cafepress.com/+india-flag+pet-apparel
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास भारतीय कायद्यानुसार तीन वर्षांचा कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अॅमेझॉनसोबतच कॅफे प्रेस ही आणखी एक अमेरिकन ऑनलाईन रिटेल कंपनी भारतीय राजमुद्रेचा अपमान होत असलेल्या उत्पादनांची विक्री करते. कॅफे प्रेसकडून कुत्र्यांना घालण्यात येणाऱ्या कपड्यांवर राजमुद्रेची छपाई करण्यात आली आहे. ‘इंडियन कोट ऑफ आर्म्स सील डॉग टि-शर्ट’ या नावाने कॅफे प्रेसकडून कुत्र्यांचे टि-शर्ट विकले जात आहे. या टि-शर्टची किंमत १९.९९ अमेरिकन डॉलर (एक हजार तीनशे बासष्ट रुपये) आहे.
राष्ट्रप्रेमी पुढील संपर्कावर अॅमेझॉन आणि कॅफे प्रेस यांचा निषेध करत आहेत.
अॅमेझॉन
ट्वीटर : https://twitter.com/amazon
फेसबूक : https://www.facebook.com/Amazon/
कॅफेप्रेस
ट्वीटर : https://twitter.com/cafepress
फेसबूक : https://www.facebook.com/cafepress
संपर्क क्रमांक : +1-877-809-1659 टोल फ्री (अमेरिका आणि कॅनडा)
+1-919-323-4480 अंतरराष्ट्रीय
वेळ : सकाळी ८ ते रात्री १० (सोमवार-शुक्रवार)
सकाळी ९ ते सायं ६ (शनिवार)