Menu Close

आयफोन पिस्तूलची युरोपने घेतली धास्ती

लंडन : आयफोन सारख्या दिसणा-या ९ एमएम डबल बॅरल पिस्तूलामुळे युरोप पोलीस सध्या हाय-अलर्टवर आहे. हे पिस्तूल जेव्हा अमेरिकेत विक्री होण्यास सुरुवात होईल तेव्हा अवैधरित्या ते युरोपात आणले जाण्याची शक्यता आहे अशी चेतावणी अधिका-यांकडून देण्यात आली आहे.

या आयफोन गनसाठी १२ हजाराहून अधिक लोकांनी ऑर्डदेखील दिली आहे. ही पिस्तूल दिसायला हुबेहूब आयफोन प्रमाणे आहे. मात्र फक्त एक बटन दाबताच त्याचं रुपांतर पिस्तूलमध्ये होत आहे. द इव्हिनिंग स्टॅडर्डने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांमध्येच युरोपमध्ये या पिस्तूलाच्या आयातीला सुरुवात होईल. हे पिस्तूल ३३० पाऊंडमध्ये विकत घेता येणार आहे, ज्याची किंमत आयफोन पेक्षा अर्धी आहे.

पोलिसांनी यासंबंधी अगोदरच चेतावणी जारी केली आहे. अशी कोणतीही पिस्तूल सध्या हाती लागलेली नाही, मात्र येत्या काही दिवसांत हे पिस्तूल युरोपमध्ये दिसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंेलिसांनी सांगितले आहे.

स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी दिलेल्या अलर्टमध्ये, ‘दिसताना हे पिस्तूल आणि मोबाईलमध्येही कोणताही फरक जाणवत नाही. अनेक लोक स्मार्टफोन बाळगतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष होण्याती शक्यता आहे’, असे सांगितले आहे. हे पिस्तूल पुढील आठवड्यापासून अमेरिकेत विक्री होण्यास सुरुवात होईल.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *