Menu Close

येथे फेरे घेऊन भगवान शिव यांनी केला होता माता पार्वतीशी विवाह, आजही जळत आहे तो अग्नी

महादेवाला पती रुपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वती देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्यांच्या विवाह प्रस्तावाला स्वीकारले होते. मान्यतेप्रमाणे महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाला होता.

त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वती देवीचे लग्न झाले होते. या गावात विष्णु देव आणि लक्ष्मी देवीचे एक मंदिर आहे. ज्याला महादेव-पार्वती विवाह स्थळाच्या रुपात ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात अशा अनेक गोष्टी आजही उपलब्ध आहे, ज्यांचा संबंध महादेव-पार्वतीच्या विवाहासोबत असल्याचे मानले जाते.

अखंड धुनी

ही त्रिर्युगी नारायण मंदिराची अखंड धुनी आहे. महादेवाने याच कुंडाच्या भोवती पार्वतीसोबत सप्तपदी घेतली होती. आजही या कुंडामधील अग्नी विझलेला नाही. या मंदिरात लाकडांना प्रसादाच्या रुपात अर्पण केले जाते. या पवित्र अग्निकुंडाची राख श्रध्दाळू घरी घेऊन जातात. वैवाहिक जीवनात येणा-या समस्या दूर करण्यासाठी ही राख फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

या ठिकाणी महादेव-पार्वती विवाह करताना बसले होते. याच ठिकाणी ब्रह्मदेवाने महादेव-पार्वतीचे लग्न लावले होते.

ब्रह्मकुंड

महादेव-पार्वतीच्या विवाहात ब्रह्मदेव पुरोहित बनले होते. याच कुंडात ब्रह्मदेवाने विवाहापूर्वी स्नान केले होते. याच कारणामुळे याला ब्रह्मकुंड म्हटले जाते. तीर्थयात्री या कुंडात अंघोळ करुन ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त करतात.

महादेवांना लग्नामध्ये दान सावरूपात मिळालेली गाय या स्तंभाला बांधली होती.

विष्णु कुंड

महादेव-पार्वतीच्या लग्नात विष्णु देवाने पार्वतीच्या भावाची भुमिका निभावली होती. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी लग्नात ज्या रिती निभावतो त्या सर्व रिती विष्णुदेवानी निभावल्या होत्या. अशी मान्यता आहे की, या कुंडात अंघोळ करुन विष्णु देवाने विवाह सहभाग घेतला होता.

रुद्र कुंड

महादेवाच्या विवाहात सहाभागी होणा-या सर्व देवी-देवतांनी या कुंडात स्नान केले होते. सरस्वती कुंडाला या सर्व कुंडांचे जल स्त्रोत मानले जाते.

संदर्भ : दिव्य मराठी

Tags : Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *