बेंगळुरू येथे पार पडली धर्मजागृती सभा
बेंगळुरू (कर्नाटक) : हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ता सिद्धेश उमत्तूरू यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील (कामाक्षीपाळ्यच्या) धनंजय पॅलेस येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. मोहन गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. शीला नारायण उपस्थित होत्या. या सभेत २३० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात २४ घंटे धर्मकार्य चालते ! – अधिवक्ता सिद्धेश उम्मत्तूरू
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याचे अवलोकन केल्यावर ते किती श्रेष्ठ कार्य करत आहेत, याची मला जाणीव झाली. सनातन तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्यात जातीभेद नाहीत. रामनाथी (गोवा) येथील त्यांच्या आश्रमात गेल्यावर तेथील साधक राष्ट्र व धर्म यांसाठी तन, मन आणि धनाचा त्याग करून धर्मकार्य करत असल्याचे लक्षात आले.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा ! – श्री. मोहन गौडा
गेल्या ६८ वर्षांपासून भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय होत आहे. हिंदु देवस्थानांचे सरकारीकरण, हिंदुविरोधी कायदे, धर्मांतर, आतंकवाद, हिंदु संतांचा अवमान इत्यादी समस्यांनी टोक गाठले आहे. यावर उपाय म्हणजे प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित झाले पाहिजे.
पुरोगाम्यांच्या धमकीला सनातन भीक घालत नाही ! – सौ. शीला नारायण
तथाकथित पुरोगामी हिंदुत्वनिष्ठांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातनवर पुरोगाम्यांनी कितीही आरोप केले, तरी सनातनचे कार्य सत्य आणि धर्माच्या आधारावर चालले आहे. पुरोगाम्यांच्या धमक्यांना भीक न घालता सनातनचे कार्य अविरतपणे चालूच आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात