चीनने ग्वादार बंदराच्या संरक्षणासाठी पाकिस्तानला २ जहाजे दिली आहेत. बलुचिस्तानमधील महत्त्वपूर्ण ग्वादार बंदर आणि चीन-पाकिस्तानमधील इकॉनॉर्मिक कॉरिडॉरच्या अंतर्गत येणाऱ्या व्यापारी मार्गांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या नौदलाला चीनकडून दोन जहाजे देण्यात आली आहेत.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये चीनकडून कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या दृष्टीने हा इकॉनॉमिक कॉरिडॉर अतिशय महत्त्वाचा आहे. याच इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या संरक्षणसाठी शनिवारी चीनकडून दोन जहाजे पाकिस्तानला सोपवण्यात आली. पाकिस्तानमधील अशांत भाग असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतात इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत ग्वादार बंदर विकसित करण्यात आले आहे. या बंदरातून निघणारा मार्ग पाकिस्तान, पश्चिम आशिया, आफ्रिकेतून जात पश्चिम चीनला युरोपशी जोडतो.
संदर्भ : लोकसत्ता