Menu Close

भाजी विक्रेता इलाही हुसेनलाल शेख याने केला १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका भाजीविक्रेत्याने १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर त्याने तरुणीच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला असून या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. इलाही हुसेनलाल शेख असे या त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडित तरुणी कामानिमित्त बाहेर जात असताना तिला इलाही हुसेनलाल शेख भेटला. इलाही हा भाजीविक्रेता असून पीडित तरुणी त्याला आधीपासून ओळखत होती. दुचाकीवर सोडतो असे सांगत इलाहीने तिला गाडीवर बसवले आणि वल्लभनगर बस स्थानकामागील निर्जन स्थळी नेले. यानंतर त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडित तरुणीने प्रतिकार केला असता इलाहीने तिच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. त्या परिस्थितीतही पीडितेने प्रतिकार करत कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली आणि  घटनास्थळाजवळील वर्क शॉपमध्ये धाव घेत मदत मागितली.

याप्रकरणी पोलिसांनी इलाहीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहे.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *