Menu Close

कंदाहार विमान अपहरणात अायएसआय चा हात, डोवाल यांचा खुलासा

नवी देहली : २४ डिसेंबर १९९९ रोजी पाच शस्त्रधारी दहशतवाद्यांनी १७८ प्रवाशांसह इंडियन एअरलाइन्सचे आयसी-८१४ विमानाचे अपहरण केले होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा कंदाहार विमान अपहरणामध्ये सहभाग होता असा खुलासा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सचे भारतातील माजी ब्‍यूरो चीफ मायरा मॅकडॉनल्‍ड यांनी कंदाहार प्रकरणावर ‘डिफीट इज अ‍ॅन ऑर्फन : हाऊ पाकिस्‍तान लॉस्‍ट द ग्रेट साउथ एशियन वॉर’ हे पुस्तक लिहिले आहे. यामध्येच डोवाल यांनी आयएसआयच्या सहभागाबाबत माहिती दिली आहे. या अपहरणामध्ये ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी चर्चा करणा-यांमध्ये डोवाल यांचा समावेश होता. या पुस्तकात डोवाल यांचा एक इंटरव्यू छापण्यात आला आहे.

या इंटरव्यूमध्ये डोवाल म्हणतात, ”आम्ही जेव्हा विमानाजवळ पोहोचलो त्यावेळी विमानाच्या आजु-बाजूला खूप तालिबानी दहशतवादी होते आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे होती. दहशतवादयांशी चर्चा करण्यास टीम पोहोचली त्यावेळी या प्रकरणात आयएसआयचा सहभाग असल्याचे आमच्या लक्ष्यात आले. अपहरणकर्ते थेट आयएसआयच्या अधिका-यांशी चर्चा करत असल्याचे कळल्यावर परिस्थिती आणखी बिघडली. तेथे जे काही घडत होते त्याची माहिती आयएसआयला मिळत होती. जर अपहरणकर्त्यांना आयएसआयने पाठिंबा दिला नसता तर ते संकट आम्ही लवकर संपवले असते. अपहरणकर्त्यांवर आम्ही जो काही दबाव निर्माण केला होता आयएसआयने तो दबाव संपवला”.

त्यावेळी १७८ प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मौलाना मसूद अझहरसह, अहमद उमर सईद शेख आणि मुस्‍ताक जरगार या ३ दहशतवाद्यांच्या सुटकेची अटक घातली होती. या दहशतवाद्यांना सोडवण्‍यासाठी भारतातून विशेष विमान पाठवले गेले होते.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *