Menu Close

पाक ने त्यांच्या जवानांना खूष करण्यासाठी १०० पश्तून तरूणींना वेश्याव्यवसायात ढकलले : उमर खट्टक

नवी देहली : पाक ने त्यांच्या जवानांना खूष करण्यासाठी १०० पश्तून तरूणींचे अपहरण केले असून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले असल्याचे पश्तून कार्यकर्ते उमर खट्टक यांनी म्हटलेय. या तरूणींनी पाकिस्तानी जवान रोज बलात्कार करत असल्याचेही त्यांनी सांगितलेय.

स्वात आणि वजिरीस्तान या भागातून या तरूणींना पळवले गेल्याचे खट्टक यांनी म्हटलेय. या भागातील जनेतवर पाक अनन्वित अत्याचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आमची गावे उद्वस्त केली जातात, आमच्यावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाते, हे केव्हापर्यंत सहन करायचे असा प्रश्न खट्टक यांच्याप्रमाणे या भागातील असंख्य लोक विचारत आहेत. पाकची मस्ती उतरवण्यासाठी त्यांनी आता बंडाचा झेंडा फडकावायचा ठरवलाय. त्यांनी पश्तूनिस्तान नावाचे वेगळे राष्ट्र व्हावे या मागणीसाठी लढवय्यांची फौज उभारायला सुरूवात केली आहे. जागतिक समुदायाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

स्त्रोत : सामना

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *