Menu Close

पाकिस्तानी वृत्त वाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हटले गुजरातचे ‘कसाई’ !

पाकिस्तानचा मोदीद्वेषच पुन्हा एकदा यातून प्रकट होतो ! – संपादक, हिंदुजागृती

पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यात आली आहे. आमिर लियाकत असे या अँकरचे नाव असून त्याने पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांच्यावरही टीका केली आहे. तारेक फतेह यांच्याबाबतीत बोलताना त्याची जीभ नरेंद्र मोदींवर घसरली. त्याने मोदींच्या वैवाहिक जीवनाबद्दलही वक्तव्य केले. मोदी हे गुजरातचे कसाई असल्याची टीका त्याने केली. सुमारे तासभर लांबीचा हा व्हिडिओ पाकिस्तानी वाहिनीने प्रक्षेपितही केला. एवढ्यावरच आमिर लियाकत थांबला नाही. तारिक फतेह हे ‘रॉ’ आणि मोदींशी संबंधित असल्याचे त्याने म्हटले. आपल्या संपूर्ण कार्यक्रमात त्याने तारेक फतेह यांचा भंडाफोड केल्याचा दावा केला. कार्यक्रमात त्याने अत्यंत अर्वाच्च भाषा वापरली.

मोदींबाबत असे वक्तव्य करण्याची पाकिस्तानी माध्यमांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मुद्रित आणि वृत्त वाहिन्यांनीही अशी शेरेबाजी केली आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांत करण्यात आला होता. ओम पुरी हे मोदींविरोधात होते म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा पाकिस्तानी माध्यमातून दावा केला जात आहे.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *