मुंबई : अंधेरी (पश्चिम) श्री दत्तगुरुनगर येथील श्री दत्तसाई मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन नुकतेच लावले होते. या प्रदर्शनाला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शन पाहून काही राष्ट्रप्रेमी नागरिकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म विषयक ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष उभारण्यात आला होता. प्रदर्शनाला भेट देणार्यांनी या कक्षाचा लाभ घेतला. प्रदर्शनासाठी श्री दत्तसाई मंदिराचे विश्वस्त श्री. चंद्रकांत पाटील आणि स्थानिक रहिवासी यांचे सहकार्य लाभले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात