इंदूर (मध्यप्रदेश) : अनेक आक्रमकांनी प्रयत्न करूनही हिंदु धर्म नामशेष न होता आजही जिवंत आहे. जगातील अन्य देशांत झालेले धर्मांतराचे प्रयत्न यशस्वी झाले; मात्र भारतातील हिंदू त्यास पुरून उरला. यातून पुनरूत्थानाची संजीवनी असलेल्या सनातन हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येते. आज हिंदु धर्माला ग्लानी आली आहे. अशा स्थितीत हिंदूंनी साधना करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले, तर पुन्हा रामराज्य निश्चितच येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते येथील आर्य समाज भवनामध्ये झालेल्या बैठकीत बोलत होते.
पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘इंग्लंडमध्ये ‘हाऊस ऑफ लॉर्ड’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ ही २ सभागृह आहेत. यातील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ने बहुमताने घेतलेला निर्णयही ‘हाऊस ऑफ लॉर्ड’ म्हणजे तेथील धनाढ्यांचे सभागृह नाकारू शकतो. जेथील संसदेतच इतकी विषमता आहे, त्यांनी जगात मानवतेची भाषा करावी, यासारखे हास्यास्पद अजून काय असेल ? त्यामुळे भारतियांना खरा विकास हवा असेल, तर त्यांनी रामराज्यासारख्या सर्वश्रेष्ठ व्यवस्थेचा अभ्यास करायला हवा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात