हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी चळवळ
बेळगाव : प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नये, अशी सूचना आम्ही आधीच सर्व कार्यालयांना देऊन याविषयी दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले आहे. ध्वजसंहितेप्रमाणे आचरण होण्यासाठी दक्षता घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार श्री. मंजुनाथ जानकी दिले. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी १३ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने श्री. मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. एस्.वाय. हलिंगळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांच्या वतीने राजपत्रित कर्मचारी श्री. ए.एस्. पाटील यांनी निवेदन स्वीकारले. श्री. पाटील यांनी ‘शैक्षणिक विभागांना याविषयी नोटीस पाठवून पुन्हा कळवण्यात येईल. त्या नोटिसाची प्रत तुम्हाला दिली जाईल’, असे सांगितले. समितीच्या वतीने पोलीस आयुक्त श्री. अमरनाथ रेड्डी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांनी ‘कुठेही राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देणार नाही. तसे कुठे आढळल्यास कार्यवाही करू’, असे सांगितले.
या वेळी धर्माभिमान्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीची ध्वनीचित्रफीती श्री. रेड्डी यांना दाखवली. तेव्हा त्यांनी ही ध्वनीचित्रफीती ‘व्हॉटस् अॅप’वर मला पाठवून द्या. ‘मी ती सर्वांना पाठवून देतो’, असे सांगितले.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
दैनिक सनातन प्रभातचे वाचक सर्वश्री गोपीनाथ महागांवकर, बजरंग दलाचे परशराम हिरोजी, अरुण सावी, योगेश जाधव, शिवाजी हिरोजी, सुमित बेळगांवकर, योग वेदांत समितीचे संजय घोरपडे, अनगोळ येथील हनुमान युवक मंडळाचे छे भैरू बेळगुंदकर, सुनील गावडे, हिंदु जनजागृती समितीचे विजय नंदगडकर, डॉ. अंजेश कणगलेकर, गजानन कारेकर, सनातन संस्थेचे अक्षय भंडारी, महादेव चौगुले, प्रसाद हळदणकर, बालसाधक कु. श्लोक नंदगडकर, कर्तव्य महिला मंडळाच्या सौ. मीलन पवार, सौ. शालिनी पाटील, जय तुळजाभवानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अर्चना पाटील, रणरागिनी शाखेच्या सौ. नम्रता कुटरे, डॉ. ज्योती दाभोलकर, सौ. अमृता मिसळ, सौ. राजश्री आसंगे, सौ. कोमल मुथुन्कर, सौ. शुभांगी कंग्राळकर