Menu Close

अध्यात्माच्या प्रसारानेच खरी सामाजिक समरसता शक्य : पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

भोपाळ (मध्यप्रदेश) : अध्यात्म समजल्याविना कोणत्याही समस्या आपण मुळापासून सोडवू शकणार नाही. सध्या सामाजिक समरसतेची चर्चा होत असते. जेव्हा जातीभेद विसरण्याचा संदेश दिला जातो, तेव्हा २ जाती वेगवेगळ्या आहेत, हे अप्रत्यक्ष मान्य केले जातेे. याउलट प्रत्येकामध्ये एकाच ईश्‍वराचा अंश आहे, हे पहायला अध्यात्म शिकवते. संत प्रत्येकामध्ये ईश्‍वरच पहात असल्याने त्यांच्याकडे विविध जातींचे लोक साधनेसाठी येतात आणि तेही प्रत्येकावर सारखेच प्रेम करू शकतात. खरी सामाजिक समरसता येण्यासाठी अध्यात्माचाच प्रसार व्हायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते येथील आधारशिला कॉलनीतील लोकांसाठी आयोजित बैठकीत बोलत होते. या वेळी अनेकांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्र आणि धर्म विषयक शंकांचे निरसन करून घेतले.

पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘अध्यात्म न समजल्यानेच काही जण छोट्याशा अनुभूती अथवा सिद्धीत अडकून त्याचा तात्कालिक स्वार्थासाठी वापर करतात. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हे तत्त्व अध्यात्मात सांगितले आहे. त्यामुळे व्यक्तीगत आणि समष्टी जीवन यांत भेद नाही. ज्या वेळी व्यक्ती स्वतःच्या व्यक्तीगत, सामाजिक आणि धार्मिक कर्तव्यांचे यथायोग्य पालन करतो, त्या वेळी नकळत त्यातून समष्टीचेच भले होत असते. खरे संत हे सिद्धीत न अडकता राष्ट्रधर्मासाठी कार्य करत असतात.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *