जयपूर : श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो; पण उच्छ्वासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केले आहे. ‘गायीचे वैज्ञानिक महत्त्व सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्याची माहिती सर्वांपर्यंत पोचवायला हवी’, असेही त्यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी विषयक समितीने वर्ष २००६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार मिथेन, कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वायूंच्या उत्सर्जनासाठी गायी आणि म्हशी यांना उत्तरदायी ठरवण्यात आले होते. चार्याचे पचन होत असतांना ढेकरच्या माध्यमातून हे वायू बाहेर पडत असतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात