Menu Close

हिंदूंच्या प्राचीन आणि विशाल मंदिरांची सध्या पाकिस्तानात अशी आहे स्थिती . . .

पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यामधील बहुतांश मंदिर हे पाकिस्तान सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरले आहेत.

शिव मंदिर, पीओके

हे मंदिर पाक अधिकृत काश्मीरमध्ये आहे. हे मंदिर केव्हा अस्तित्वात आले याचा इतिहास उपलब्ध नाही. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर काही वर्ष हे मंदिर चांगल्या अवस्थेमध्ये होते, परंतु काही काळानंतर येथे येणाऱ्या भक्तांची संख्या कमी होऊ लागली. यामुळे सध्या हे मंदिर भग्नावस्थेमध्ये रूपांतरित झाले आहे.

गौरी मंदिर, थारपारकर

पाकिस्तानातील हे मंदिर सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात आहे. पाकिस्तानातील या जिल्ह्यात बहुसंख्य हिंदू असून यामध्ये आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. पाकिस्तानात यांना थारी हिंदू म्हटले जाते. गौरी मंदिर मुख्य स्वरुपात जैन मंदिर आहे परंतु या मंदिरात विविध देवी-देवतांचा मूर्ती आहेत. या मंदिराची स्थापत्य शैली राजस्थान आणि गुजरात सीमेवरील स्थित असलेल्या माउंट आबू येथील मंदिरांसारखी आहे. या मंदिराची उभारणी मध्ययुगात झाली आहे. पाकिस्तानातील बिघडत्या परिस्थितीमुळे आणि कट्टरपंथी प्रभावामुळे हे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे.

गोरखनाथ मंदिर, पेशावर

पाकिस्तानातील पेशावर शहरात स्थित हे ऐतिहासिक मंदिर १६० वर्ष जुने आहे. फाळणीनंतर हे मंदिर बंद करण्यात आले होते. पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहा दशकानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये हे मंदिर पुन्हा उघडण्यात आले. हे मंदिर उघडण्यासाठी पुजा-याची मुलगी फुलवतीने याचिका दाखल केली होती.

शारदा पीठ, काश्मीर

शारदा पीठाचे महत्त्व यामुळे अधिक आहे कारण हे ५२ शक्तीपिठांमध्ये नाही तर १८ महाशक्तिपीठातील एक आहे. हे विद्या साधनेचे उन्नत केंद्र होते. शैव संप्रदायाचे जनक शंकराचार्य आणि वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक रामानुजाचार्य हे दोघेही येथे आले आणि यांनी महत्त्वपूर्ण गोष्टी साध्य केल्या. शंकराचार्य येथेच सर्वज्ञपीठमवर बसले आणि रामानुजाचार्य यांनीसुद्धा येथेच श्रीविद्या भाष्य प्रवर्तित केले. पंजाबी भाषा गुरुमुखी लिपीचा उगम शारदा लिपीतूनच होतो. या मंदिरापासून विविध विद्याकेंद्र निगडीत होते, परंतु आता असे नाही. आता केवळ काश्मीर आहे परंतु देवी शारदेचे काहीच अस्तित्व नाही. सनातन धर्मशास्त्रानुसार भगवान शंकरांनी सतीच्या शवसोबत जे तांडव केले होते तेच सतीचा उजवा हात याच पर्वतराज हिमालयातील काश्मीरमध्ये पडला होता.

कटासराज मंदिर, चकवाल

पाकिस्तानातील प्रांजाब प्रांतामधील चकवाल क्षेत्रामध्ये ९१० वर्षांपूर्वीचे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. भारत-पाकिस्तान फाळणी काळात १९४७ मध्ये हे मंदिर बंद करण्यात आले होते. २ जानेवारी २०१४ रोजी या मंदिरात आरतीचे स्वर पुन्हा ऐकू आले. पाकिस्तान सरकार या मंदिराची पुनर्स्थापना करून दोन हेतू साध्य करणाच्या विचारात आहे. पहिला हेतू म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार करून पर्यटनाचे मोठे केंद्र निर्माण करणे आणि दुसरा हेतू पाकिस्तानात अल्पसख्यकांमध्ये भेदभाव केला जातो या आरोपाला खोडून काढणे.

हिंग्लाज देवी मंदिर, बलुचिस्तान

पाकिस्तानातील हिंग्लाज देवी मंदिर एक प्राचीन मंदिर मानले जाते. या मंदिराला देवीच्या प्रमुख ५१ शक्तीपीठांमध्ये गणले जाते. या ठिकाणी आदिशक्तीचे ‘शीर’ पडले होते असे मानले जाते. हे मंदिर बलुचिस्तानमधील ल्यारी जिल्ह्यातील हिंगोल नदीजवळ स्थित आहे.
भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी या ठिकाणी लाखो भक्त दर्शनासाठी येत होते, परंतु सध्याच्या स्थितीमुळे भक्तांची संख्या खूपच कमी झाली आहे. तरीही स्थानिक लोकांमध्ये या मंदिराचे खूप महत्त्व आहे. या देवीच्या दर्शनासाठी गुरु गोविंदसिंह आले होते असे सांगितले जाते. या ठिकाणी महादेवाचे प्राचीन त्रिशूळसुद्धा आहे.

स्वामी नारायण मंदिर, कराची


कराचीतील हे मंदिर ३२,३०६ स्क्वेअर क्षेत्रामध्ये आहे. हे एम. ए. जिन्ना रोडवर स्थित आहे. एप्रिल २००४ मध्ये या मंदिराला १५० वर्ष पूर्ण झाले. या मंदिरात दर्शनासाठी हिंदू लोकांसोबतच मुस्लिम लोकही येतात.

पंचमुखी हनुमान मंदिर, कराची

१५०० वर्ष जुने हनुमानाचे पंचमुखी मंदिर कराची येथील शॉल्जर बाजारात स्थित आहे. या मंदिराच्या बांधकामात जोधपुर बांधकामाची झलक दिसते. या मंदिराच्या जीर्णोद्धाराची नितांत आवश्यकता असून सध्या यावर एकमत झाले आहे.

संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *