वॉशिंग्टन : जेव्हा निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ज्या निवडक गोष्टी ते स्वतःबरोबर बाळगतात, त्यात हनुमानाची मूर्ती कायम त्यांच्या खिशात असते.
यू ट्यूबवरील मुलाखतीत ओबामा यांनी ही माहिती दिली. यू ट्यूब निर्माता निल्सन यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी ओबामा यांना व्यक्तिगत प्रेरणा देणाऱ्या वस्तू दाखविण्यास सांगितले. त्यावेळी ओबामा यांनी खिशातून छोट्या, छोट्या वस्तू काढून दाखविल्या.
‘माझ्या प्रवासात या वस्तू मला भेटलेल्या लोकांची आठवण करून देतात,’ असे ते म्हणाले. सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले आहे. पोप फ्रांसिस यांच्याकडून मिळालेली माळ, बौद्ध भिक्षुकडून मिळालेली बुद्धाची मूर्ती, हनुमानाची मूर्ती अशा गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स