- बहुसंख्य हिंदूंच्या देशात वेदपाठशाळांना नव्हे, तर मदरशांना माध्यान्ह भोजन मिळणार, हे लक्षात घ्या !
- मदरशांतून आतंकवादी निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या असतांना त्यांना खिरापत वाटणारे सरकार हिंदूंना धर्मशिक्षण देणार्या संस्थांकडे मात्र दुर्लक्ष करते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : आगामी काळात आधुनिक शिक्षण देणार्या मदरशांना माध्यान्ह आहार देण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी येथे झालेल्या राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या वार्षिक परिषदेनंतर प्रसारमाध्यमांना या संदर्भातील माहिती दिली. या बैठकीत नक्वी यांनी मदरशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्याकडून या संदर्भात सूचना मागवल्या होत्या. या वेळी नक्वी यांनी धार्मिक हिंसाचाराच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचाही दावा केला. सरकारच्या ३२ मासांच्या काळात कोणतीही मोठी धार्मिक हिंसाचाराची घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. (गेल्या ३२ मासांत धर्मांधांकडून हिंदूंवर किती हिंसाचाराच्या घटना झाल्या, याची आकडेवारी नक्वी का सांगत नाहीत ? देशात अल्पसंख्यांकांवर आक्रमणे होत नाहीत, तर धर्मांध अल्पसंख्यांकांकडूनच बहुसंख्य हिंदूंवर आक्रमणे होत आहेत, हे नक्वी यांना माहिती आहे का ? उत्तरप्रदेश, बंगाल, आसाम, केरळ येथे हिंदूंवर आघात केले जात आहेत, तेथून हिंदूंना पलायन करावे लागत आहे, हे नक्वी जाणून घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
नक्वी म्हणाले की, मदरसे हे भारतीय शिक्षणव्यवस्थेचा भाग नाहीत, ही समजूत चुकीची आहे. अनेक मदरसे चांगल्याप्रकारे काम करत आहेत. (सर्वच मदरशांमधून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जात नाही, याविषयी नक्वी का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात