हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ
विविध ठिकाणच्या पोलीस अधिकार्यांना निवेदने देतांना हिंदुत्वनिष्ठ, तसेच समितीचे कार्यकर्तेे
पुणे – राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात राष्ट्रध्वजाची विटंबना होते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही चळवळ राबवत आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध पोलीस ठाणी, तसेच शाळा-महाविद्यालये या ठिकाणी निवेदन देण्यात आले. प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजांवर बंदी असल्याने त्यांची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
१. फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांना निवेदने देण्यात आली. निवेदन दिल्यानंतर श्री. विजयसिंह गायकवाड यांनी ‘समितीचे कार्य चांगले आहे. आपण या उपक्रमासाठी मिळून प्रयत्न करूया’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. श्री. बाळासाहेब कोपनर यांनी ‘कुठेही अपप्रकार दिसल्यास आम्हाला कळवा, आम्ही त्वरित कारवाई करू’, असे आश्वासन दिले. ही निवेदने देतांना धर्माभिमानी सर्वश्री रामनाथ दास, विकास गोगावले आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
२. वृक्ष संवर्धन समितीचे श्री. जयदीप पडवळ आणि समितीचे कार्यकर्ते यांनी कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांना निवेदन दिले.
३. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मशिक्षण वर्गातील सर्वश्री सचिन खेले, भूषण भोळे, शिववंदना गटाचे उमेश पवार यांसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सांगवी परिसरातील मास्टरमाईंड इंग्रजी माध्यम शाळा, पिंपरी-चिंचवड मनपा शाळा, काशी-विश्वेश्वर इंग्रजी माध्यम शाळा, पिंपरी-चिंचवड मुलांची शाळा येथील मुख्याध्यापकांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी धर्माभिमानी श्री. भूषण भोळे औंधहून २ किलोमीटरहून अधिक अंतर चालत आले होते. (असे राष्ट्रप्रेमी नागरिक हीच राष्ट्राची शक्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णू जगताप यांनी निवेदन स्वीकारतांना ‘समिती चांगले कार्य करत आहे. आम्ही या संदर्भात समाजात प्रबोधन करणार आहोत’, असे सांगितले. निवेदन देतांना हिंगणे येथील शिवसेना शाखाप्रमुख सर्वश्री सुधाकर मोरे, धर्माभिमानी गणेश पवार यांसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे ग्रामीण-हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कैलास पिंगळे यांनाही निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक सर्वश्री हरिश्चंद्र (अण्णा) दांगट, महालक्ष्मी मंदिराचे पुजारी देवेंद्र शूर, धर्माभिमानी रामचंद्र पोलेकर, सोमनाथ शिंदे, तसेच समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
५. नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.
भोर येथे पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन सादर
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी भोर येथील पोलीस ठाणे अंमलदार विजय जाधव आणि तहसीलदार सौ. वर्षा शिंगण-पाटील यांना १६ जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायककाका सणस, योग वेदांत समितीचे श्री. अशोक बारीक, धर्माभिमानी सर्वश्री संकेत पिसाळ, युवराज मगर, मनोज नाझीरकर, महेश नवघणे, सनातन संस्थेचे श्री. साहिल जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विश्वजित चव्हाण अन् श्रीकांत बोराटे हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात