अंबिका नगर, बाळे : भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचे आचरण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी येथील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केले. या वेळी संक्रांतीचे महत्त्व, लव्ह जिहाद, धर्माचरणाचे महत्त्व यांवरही मार्गदर्शन करण्यात आले. याचा ४० महिलांनी लाभ घेतला. त्यांनी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचीही मागणी केली. या वेळी सौ. सोनाली कस्तुरे, दीपाली तेलगाव आणि ज्योती पवार यांनी सांगितले, कार्यक्रम चांगला झाल्याने आम्हाला इथून जावेसेच वाटत नाही. तुम्ही दिलेली अमूल्य माहिती बाहेर पैसे देऊनही मिळणार नाही.
भुलाभाई चौक आणि सुनील नगर येथे तीळगूळ वाटप
भुलाभाई चौक येथील सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अनंत साळुंखे, शिवसेनेचे श्री. संजय साळुंखे आणि श्री. सिद्धेश्वर भोसले, मनसेचे श्री. अनिल छत्रबंड आणि भाजपचे श्री. ज्ञानेश्वर कारभारी यांसह १५० घरांमध्ये धर्माभिमानी रमेश पांढरे, सिद्धेश्वर विटकर, लक्ष्मण धोत्रे (आप्पा) आणि बाबू मंजुळे यांनी तीळगूळ वाटप केले. सुनील नगर येथे सर्वश्री अंबादास सब्बन, यादगिरी नराल, रमेश चक्राल, अंबादास बत्तूल, नरसिंग आडम, जय भवानी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि वन्दे गोमात्रम् बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तीळगूळ वाटप मोहिमेत सहभाग घेतला. या वेळी ७० जणांना तीळगूळ वाटप करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात