१९ जानेवारी या दिवशी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या विस्थापन दिनानिमित्त…
वर्ष १९८९-९० ! नुसते आठवले तरी आजही काश्मिरी हिंदूंचा थरकाप उडतो ! काश्मीर खोरे आणि बांगलादेश येथे धर्मांध जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंचा अक्षरश: वंशविच्छेद आरंभला. काश्मीर खोर्यातील ५ सहस्र वर्षांपूर्वीची काश्मीरची पुरातन संस्कृती संपवण्यासाठी वर्ष १९८९ पासून काश्मीरमध्ये नव्याने आतंकवादी आक्रमणे चालू झाली. आतंकवाद्यांनी हिंदूंची हत्या, बलात्कार अन् देवळांचा विध्वंस करणे चालू केले. शेवटी काश्मिरी हिंदूंना १९ जानेवारी १९९० या दिवशी स्वत:चे घरदार सोडून केवळ अंगावरील वस्त्रांनिशी विस्थापित व्हावे लागले. काश्मीरमध्ये रहाणार्या एकूण ४ लाख ५० सहस्र अर्थात् ९९ टक्के काश्मिरी हिंदूंना आतंकवाद्यांकडून बलपूर्वक हुसकावण्यात आले. वर्ष १९८९ पासून त्यांना विस्थापिताचे जीवन जगावे लागत आहे. जगातील काही मोठ्या विस्थापनांपैकी एक म्हणजे ५ लाख काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ! तथापि त्यांच्या साहाय्याला भारतातील कोणीही धावून गेले नाही. ही अत्यंत खरोखरंच लज्जास्पद गोष्ट होती. त्या वेळच्या निधर्मी काँग्रेस सरकारने हे अत्याचार काश्मीरच्या बाहेरील लोकांना समजूच नयेत, याचा पूर्ण बंदोबस्त केला.
काश्मिरी हिंदूंना न्याय देण्यासाठी श्री. फ्रान्सुआ गोतिए हा फ्रेंच पत्रकार स्वतः लढत होता. ज्यू आणि इतरांवर झालेल्या अत्याचारांची प्रदर्शने जगात ठिकठिकाणी आहेत; परंतु हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे प्रदर्शन कोठेही नाही; म्हणून श्री. फ्रान्सुआ गोतिए यांनी काश्मीर आणि बांगलादेश येथे जाऊन ‘फॅक्ट’ (फाईट अगेन्स्ट कंट्युनिईंग टेरिरीझम) या छायाचित्र प्रदर्शनाची निर्मिती केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही यापूर्वी हे प्रदर्शन ठिकठिकाणी लावण्यात आले. पुढील निवडक चित्रे ही या ‘फॅक्ट’ प्रदर्शनातीलच आहेत. गेल्या २७ वर्षांत विस्थापिताचे जीवन जगणार्या हिंदूंवरील हे अत्याचार देशबांधवांना कळावेत, यासाठी ही चित्रे प्रसिद्ध करत आहोत.
(टीप : ही चित्रे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून केवळ जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध केली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
काय घडले काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात ?
आतंकवाद्यांची हिंदूंना काश्मीर सोडण्याची धमकी : १९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांध आतंकवाद्यांनी ‘हिंदूंनी काश्मीरमधून चालते व्हावे’, अशी जाहीर धमकी वर्तमानपत्रांतील विज्ञापने, तसेच पत्रके यांद्वारे दिली.
आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंसमोर ठेवलेले पर्याय :
१. धर्मांतर करा
२. काश्मीर सोडा अन्यथा
३. मरण्यास तयार व्हा !
आतंकवाद्यांच्या धमकीचे काश्मिरी हिंदूंवर झालेले परिणाम !
१. हिंदूंनी धर्मांतर न करता स्वतःची भूमी आणि मालमत्ता यांचा त्याग करून काश्मीर सोडले, म्हणजे हिंदुबहुल राष्ट्रात हिंदूंवरच विस्थापित होण्याची पाळी आली.
२. काश्मीर न सोडलेल्या हिंदूंना आतंकवाद्यांच्या अनन्वित अत्याचारांना बळी पडावे लागले, तसेच हिंदूंच्या घरादारांची राखरांगोळी झाली.
कसा आहे आजचा काश्मीर ?
१. बहुतांश ठिकाणी पाकचा ध्वज फडकवणारा !
२. पाकप्रमाणे दर शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी घेणारा !
३. क्रिकेट सामन्यांत पाक जिंकल्यावर विजयोत्सव साजरा करणारा !
४. केवळ २ टक्के हिंदु लोकसंख्या असलेला आणि एकही देऊळ नसलेला !
हिंदूंचा थरकाप उडवणार्या धमक्या !
१. काश्मिरात रहायचे असेल, तर ‘अल्ला-हो-अकबर’ म्हणावे लागेल !
२. आम्हाला हवे पाकिस्तान, हव्यात हिंदु स्त्रिया; पण नकोत त्यांचे पती !
३. मुसलमानांनो उठा, जागे व्हा ! जिहादसाठी (हिंदूंना ठार मारण्यासाठी मुसलमानांनी पुकारलेले धर्मयुद्ध ) सज्ज व्हा ! काफिरांनो (हिंदूंनो) पळा !!
४. अरे पापी काफिरांनो, आमचा काश्मीर सोडून चालते व्हा !
५. (काश्मीर) येथे निजाम-ए-मुस्तफा (इस्लामी राज्य) चालू होणार आहे !
६. इस्लाम आमचे ध्येय ! कुराण आमचा धर्म !! जिहाद आमचा मार्ग !!!
७. आम्हाला हवे इस्लामिक सरकार ! काश्मीरला हवे इस्लामिक सरकार !! हिंदुस्थानला हवे इस्लामिक सरकार !!!
आतंकवादी फतवे काढून, वृत्तपत्रांत देऊन, ध्वनीक्षेपकावर घोषणा करून, गल्लीबोळांत आणि हिंदूंच्या घराघरांवर पत्रके चिकटवून अशा प्रकारच्या धमक्या देतात अन् काश्मिरी हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडतात !
काश्मिरी हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही कोट्यवधी हिंदू बघ्याची भूमिका घेत आहेत. हिंदूंनो, आपल्या धर्मबांधवांसाठी आतातरी जागे व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
आतंकवाद्यांची निर्घृणता !
जम्मू – मणिराम, मोहनलाल यांची पत्नी विद्यादेवी आणि तिची ३ मुले जिवंत आहेत. विद्यादेवीची १३ वर्षांची मुलगी संदेशदेवी ही आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे डोक्याची कवटी फुटून झालेल्या गंभीर जखमेवर रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यासमवेत तिचे काका किसनलाल आहेत. त्यांचे वडील चंदूराम हेही प्राणकोट येथील हत्याकांडाचे बळी ठरले आहेत. (‘दैनिक टाइम्स ऑफ इंडिया’, २६.४.१९९८)
काश्मीरमधील हृदयद्रावक नरसंहार !
प्राणकोट येथे मुलांची कुर्हाडीने हत्या आणि मोठ्यांचा लाठीहल्ल्यात अंत !
जम्मू – उधमपूर जिल्ह्यातील प्राणकोट येथील हत्याकांडातील मृतांची संख्या २६ झाली. यांपैकी काही मुलांची कुर्हाडीने हत्या केल्याचे आणि काहींचा लाठीहल्ल्यात अंत झाल्याचे निदर्शनास आले.
केंद्रीय गृहमंत्री श्री. लालकृष्ण अडवाणी आणि काश्मीरचे मुख्यमंत्री श्री. फारूख अब्दुल्ला यांनी घटनास्थळाला भेट दिली.
तेव्हा त्यांनी या नरसंहाराच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगितले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजेश पायलट यांनीही या गावाला भेट दिली आणि ते म्हणाले, ‘‘या पाशवी नरसंहाराहून अधिक भीषण कृत्याची कल्पना करणे अशक्य आहे.’’ (‘दैनिक टाइम्स ऑफ इंडिया’, २०.४.१९९८)
ही स्थिती अशीच राहिल्यास न जाणो, आतंकवाद उद्या तुमचाही बळी घेईल ! त्यासाठी हिंदूंनो, जागृत अन् संघटित व्हा !!
आतंकवाद्यांनी उद्ध्वस्त केलेली हिंदूंची मंदिरे !
१९ ते २१.२.१९८६ या कालावधीतील मंदिरांचा विध्वंस
१. कुपवाडा जिल्हा : टेकपुरा, लालपुरा आणि हदवारा.
२. बदगाम जिल्हा : बदगाम शहर, याछगम आणि चादुरण.
३. बारामुल्ला जिल्हा : बारामुल्ला शहर, बंकूरा, सोपोर आणि बांदीपुरा.
४. श्रीनगर जिल्हा : गनपटयार, जवाहर नगर, माइसूमा, दुलामुला, वकसुरा आणि गंधेरबल येथील देवालये आणि श्री रघुनाथ मंदिर.
५. अनंतनाग जिल्हा : अनंतनाग शहर, अच्छाबल, सगम, क्रांगस, कटन, सालार, नाआगाम, तीलयानी, मोहीरपुरा, गौतमनाग, डायलगाम, ऐशमुकाम, बिजबिराहा, बानपोह (गासीपोरा), धानव, चोगम, वैरीनाग, तरकीपोरी, दातेपुरा, त्रिसाल आणि क्थुइल (पुलवामा).
८ आणि ९.१२.१९९२ या दिवशी बाबरी मशीद पाडल्यानंतर विध्वंस केलेली मंदिरे
१. अनंतनाग : वैरीनाग, बोटासर मंदिर आणि आश्रम, कुळगांव, शिवमंदिर, उतारस, चित्रगुंड, पट्टन, शिव-विष्णु मंदिर (बारामल्ला) आणि बहारीआंगन पुरातन मंदिर.
२. श्रीनगर : नोगम, करफाली मोहल्ला, यान मोहल्ला येथील मंदिरे आणि मगरमल बाग मंदिर.
३. विविध ठिकाणची मंदिरे : बारामुल्ला येथील झेलम नदीकाठचे शिव-विष्णु मंदिर आणि पहलगाम-पट्टन मंदिर, नारायण बाग, शादीपूर (गंधरबल) येथील मंदिर आणि पाठशाळा, सुंबालचे नंदाकेशवारा भैरव मंदिर, पहलगामचे मंदिर आणि हवनशाळा, हंदवाडा येथील बुटा गुंड आणि टोगलचे मंदिर, सूरनकोटचे मंदिर.
आतंकवाद्यांच्या रोमारोमांत भिनलेला विध्वंस !
काश्मीरमध्ये हिंदूंच्या पूर्वीच्या अशा मोठमोठ्या घरांचे भग्नावशेष ठिकठिकाणी पहायला मिळतात. सध्या त्या हिंदूंना विस्थापितांच्या छावण्यांत १० × १० फुटांच्या तंबूत दुर्धर स्थितीत जीवन कंठावे लागत आहे.
स्वधर्माच्या रक्षणासाठी काश्मिरी हिंदू बनले विस्थापित !
काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोरे सोडणे का भाग पडले, हे आतंकवाद्यांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या पुढील कारवायांवरून स्पष्ट होते.
१. १०५ शैक्षणिक संस्थांची नासधूस !
२. २० सहस्र कुटुंबांच्या जमिनींवर कब्जा !
३. १२ सहस्र कुटुंबांच्या बागायतींवर कब्जा !
४. १०३ सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांची नासधूस !
५. २० सहस्र घरांची जाळपोळ !
६. ९५ टक्के घरांची लूटमार !
७. ९३ सहस्र हिंदूंच्या कत्तली !
आतंकवाद्यांच्या धमक्यांना घाबरून काश्मिरी हिंदूंनी धर्मांतर केले असते, तर वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग घेत ते ऐषारामी जीवन जगू शकले असते; पण स्वधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी घरदार आणि जमीनजुमला यांचा त्याग करून विस्थापितांचे हालाखीचे जीवन जगणे स्वीकारले.
आतंकवाद्यांच्या क्रौर्याची परिसीमा !
काश्मिरी हिंदु जगन्नाथ (वय वर्षे ४२) यांची मुलगी सीमा अवघ्या ६ वर्षांची असतांनाच तिच्या जीवनाला कायमचे वेगळे वळण मिळाले. ८.६.१९९९ या दिवशी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काही आतंकवादी सुरे आणि बंदुका घेऊन सीमाच्या घरात घुसले आणि त्यांनी तिच्या वडिलांसह दोघा तरुण भावांना डांबून ठेवले. आतंकवाद्यांनी सीमाचा १७ वर्षांचा भाऊ ऋषी याचा छळ करायला प्रारंभ केला. सीमाच्या वडिलांनी त्या नराधमांना ‘मला मारा; पण माझ्या मुलांना सोडा’, अशी कळवळीने विनवणी केली.
त्यांची ही विनवणी धुडकावून आतंकवाद्यांनी ऋषीला त्याच्या वडिलांदेखत हालहाल करून ठार मारले. हे सर्व सीमा भेदरलेल्या नजरेने पहात होती. त्यानंतर त्यांनी तिचा १३ वर्षांचा भाऊ राजिंदरला उलटे टांगून त्याचे शिर धारदार सुर्याने धडावेगळे केले. सीमाच्या वडिलांचीसुद्धा तशीच अवस्था केल्यावर त्या नरपशूंनी तिच्या आईलाही बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार मारले. त्यानंतर ते धर्मांध आतंकवादी आसुरी आनंदाने निघून गेले.
अख्ख्या कुटुंबाचा डोळ्यांदेखत झालेला संहार असहाय्यपणे पहावे लागणार्या चिमुरड्या सीमाला तरी त्यांनी का मोकळे सोडले असावे, हे कुणास ठाऊक ! कुटुंबियांच्या प्रेतांकडे पाहून शोक करण्याचे नशिबी आलेल्या सीमाच्या सांत्वनासाठी मात्र तेथे चिटपाखरूही नव्हते !
हिंदूंनो, जागृत व्हा ! आतंकवाद काश्मीर पुरताच मर्यादित राहिला नसून तो आपल्या दाराशी येऊन पोचला आहे.
काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजन करण्यामागील हिंदु जनजागृती समितीचे उद्देश !
काश्मिरी हिंदूंच्या विस्थापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीकडून लावण्यात येणार्या प्रदर्शनामागील उद्देश –
१. राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे यांनी हिंदूंपासून लपवून ठेवलेले काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे भीषण सत्य उघड व्हावे !
२. हिंदूंना वाढत्या जिहादी आक्रमणांची जाणीव होऊन त्यांच्यात क्षात्रतेज वाढावे आणि त्यांनी धर्मबंधूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा !
३. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या चुकांमुळे निर्माण झालेल्या काश्मीर समस्येविषयी हिंदूंमध्ये जागृती होऊन ते विस्थापित हिंदूंचे काश्मीरमधील पुर्नवसन होण्यासाठी कृतीशील व्हावेत !
हिंदु धर्मावर घाला घालणारी काश्मीरवरील सुलतानी आक्रमणे !
सुलतानी आक्रमणांपूर्वी काश्मीरची सुसंस्कृतता आणि संपन्नता दर्शवणारी वैशिष्ट्ये !
- २ सहस्र वर्षे विद्येचे माहेरघर म्हणून ओळख !
- इतिहास, काव्य, कादंबरी, बोधकथा आणि तत्त्वज्ञान यांविषयक उत्कष्ट कलाकृतींचा उगम !
- अनेक संस्कृत विद्वान, कवी, कलाकार आणि धर्मोपदेशक यांची जन्मभूमी !
- महान मौर्य सम्राट अशोकाच्या काळात भरभराट झालेले राज्य !
क्रूर मंगोल युद्धखोर दुलुचाचे पाशवी आक्रमण आणि हिंदु राज्याचा अंत !
महान हिंदु राजा हर्ष याच्या काळात काश्मीरमध्ये संस्कृती, सहिष्णुता आणि विद्वत्ता यांचे सुवर्णयुग होते. या राज्यावर
१४ व्या शतकाच्या आरंभी एक व्रूर मंगोल युद्धखोर दुलुचा याने स्वारी केली. त्याने सहस्रो हिंदूंच्या कतली केल्या आणि हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली. या पाशवी आक्रमणामुळे काश्मीरच्या हिंदु राज्याचा सर्वतोपरीने अंत झाला.
सिकंदरकडून हिंदु धर्मावर घाला !
सुलतान सिकंदराच्या काळात करण्यात आलेली दुष्कृत्ये
- हिंदूंच्या उत्सवांवर बंदी !
- उत्सवांत संगीत वर्ज्य !
- कपाळावर तिलक लावण्यास मज्जाव !
- हिंदूंवर ‘जिझिया’ कर !
- सुप्रिसिद्ध मार्तंड मंदिरासह सर्वच हिंदु श्रद्धास्थानांचा विध्वंस !
- हिंदूंचे सक्तीने धर्मांतर !
या सर्वांचा परिणाम म्हणजे, जुलमी राजवटीपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी आणि आपला धर्म अन् ग्रंथसंपदा यांचे जतन करण्यासाठी सहस्रो हिंदूंनी स्थलांतर केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात