रायचूर (कर्नाटक) : येथील ‘वीर सावरकर युथ असोशिएशन’च्या वतीने ‘स्वच्छ भारत स्वच्छ रायचूर’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या समारोपाचा १०० वा रविवार १५ जानेवारी २०१७ या दिवशी श्रमदान करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीनेही सहभाग घेतला होता. या मोहिमेत ‘ग्रीन रायचूर’चे अध्यक्ष श्री. कोंदा कृष्णमूर्ती, ‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे श्री. रघवेंद्र मुलिमणी, हिंदु जनजागृती समितीचे श्रीमती कृष्णावेणी, श्री. गोवर्धन, श्री. ज्ञानेश ‘पिरॅमीड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट’चे श्री. राजशेखर, ‘विवेक जागृत बलगा’चे श्री. येरण्णा आणि ‘विवेकानंद युथ मुव्हमेंट’च्या कु. हम्पांपा इत्यादी सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात