१५ जानेवारी २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा आणि नारी सुरक्षा सेना यांनी येथील टाऊन हॉलसमोर महिला असुरक्षित असल्याचा निषेध करून त्यांच्या सुरक्षेची मागणी केली. नारी सुरक्षा सेनेच्या सौ. अनुराधा, रणरागिणीच्या कु. भव्या गौडा अणि मुगुरी समुदायाच्या सौ. मंजुला मुगुरी या आंदोलनात सहभागी होत्या.
सध्या हिंदूंच्या संतांची अपकीर्ती केली जाते. आपण सर्वांनी एकजूट करून त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. कित्तुरची राणी चेन्नमा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे निडर होऊन समाजकंटकांना धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अधिवक्ता श्रीमती प्रमिला नेसरगी यांनी केले. महिलांच्या संरक्षणाची आज अत्यंत आवश्यकता आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजे. आतापर्यंत आपण अन्नपूर्णा आणि लक्ष्मी होतो; परंतु आता आपल्याला सध्याची विचित्र परिस्थिती लक्षात घेऊन दुर्गा, चंडी झाले पाहिजे. प्रत्येक महिलेने आता स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वत:चे दायित्व सांभाळून समाजातील दुष्टांचा प्रतिकार केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात