मिरज : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ जानेवारी या दिवशी कुकडे गल्ली येथे सौ. रुपाली दिलीप चोरगे यांच्या घरी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मकरसंक्रांतीचे महत्त्व, ओटी कशी भरावी यांसह अन्य माहिती कु. सुरेखा आचार्य यांनी सांगितली. या समारंभाचा लाभ ९२ महिलांनी घेतला. कार्यक्रमस्थळी धर्मशिक्षणाचे फलक लावण्यात आले होते. ते वाचून महिलांनी धर्मशिक्षणाची माहिती जाणून घेतली. या समारंभाचे आयोजन सौ. रत्ना भंगाळे, सौ. रूपाली चोरगे, सौ. सविता कुकडे आणि सौ. पुष्पा वाडकर यांनी केले होते.
याच्या आयोजनात कुकडे गल्लीतील धर्मशिक्षण वर्गातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमातून आम्हाला नियोजन शिकायला मिळाले. कार्यक्रम फार छान झाला आणि माहिती मिळाल्याने भाव जागृत झाला. घरी एखादा कार्यक्रम झाला, तर दमल्यासारखे होते; पण आज वेगळाच उत्साह जाणवत आहे, असे या महिलांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात