आचारसंहितेचा भंग केल्याचा खटला प्रविष्ट
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंकडून होणारा अधर्म ! हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : उत्तरप्रदेशातील निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. या वेळी प्रचारासाठी या पक्षांनी काढलेल्या भित्तीपत्रकात अखिलेश यादव यांना अर्जुनाच्या रूपात, तर राहुल गांधी यांना कृष्णाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. महाभारतात युद्धापूर्वी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला. त्याच प्रकारचे चित्र लावण्यात आले आहे. या भित्तीपत्रकामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील, असे सांगत वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा खटला प्रविष्ट केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात