असे प्रशासकीय अधिकारी सर्वत्र हवेत !
मिरज : राष्ट्रध्वजाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती करत असलेले प्रबोधन अत्यंत स्तुत्य आहे. या विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यापेक्षाही अधिक कृती होणे अपेक्षित आहे. आपण ध्वजसंहितेच्या संदर्भात दहा मोठे फ्लेक्स करून शहरात लावू, तसेच प्रबोधन होण्यासाठी शहरात मोठी फेरी काढू, असे मत मिरज प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन दिल्यावर ते बोलत होते. (राष्ट्रध्वजाच्या संदर्भात विषय लक्षात आल्यावर तात्काळ कृतीशीलतेची दिशा देणार्या प्रांताधिकार्यांचा इतर प्रशासकीय अधिकार्यांनाही आदर्श घेऊन त्याप्रमाणे कृती करावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रांताधिकारी पुढे म्हणाले, मी शिक्षणाधिकार्यांना बोलावून घेतो. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास निश्चित फरक पडेल. यामुळे लोकांनाही हळूहळू चांगली सवय लागेल. असे सांगून प्रांताधिकार्यांनी त्यांचा स्वत:चा भ्रमणभाष क्रमांकही दिला. हेच निवेदन मिरज तहसीलदारांनाही देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. चिदंबर करकल, डॉ. श्रीमती मृणालिनी भोसले, कु. सुरेखा आचार्य, सौ. रत्ना भंगाळे, सौ. चोरगे, सौ. कुकडे, सौ. नयना जोशी उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात