Menu Close

काश्मीरमधून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे ! – रमेश शिवपुरी, काश्मीर हिंदु सभा

‘पनून काश्मीर’च्या वतीने ‘काश्मिरी हिंदू विस्थापनदिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम

IMG-20170120-WA0006

पुणे : आजची काश्मीरसमस्या ही राजकीय नसून ही दोन धर्मांची लढाई आहे. गेल्या १ सहस्र वर्षांपासून धर्मांधांकडून हिंदूंवर प्रहार होत आहेत. गेल्या ७० वर्षांत हिंदूंना हिंदूंच्याच देशातून विस्थापित व्हावे लागत आहे. आज धर्मांध हे आमच्याच छाताडावर उभे राहून उघडउघड विरोध करत आहेत. त्यामुळे आपल्याला आपला काश्मीर मिळवण्यासाठी तेथून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे, असे परखड प्रतिपादन काश्मीर हिंदु सभेचे माजी अध्यक्ष श्री. रमेश शिवपुरी यांनी केले. ‘पनून कश्मीर’च्या वतीने १९ जानेवारी या दिवशी ‘काश्मिरी हिंदू विस्थापितदिना’च्या निमित्ताने धानोरी (जिल्हा पुणे) येथील काश्मीर भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काश्मीर हिंदु सभेचे अध्यक्ष श्री. जगमोहन कौल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अमर मालमोही, काश्मीर वाहिनीच्या रितु सुंभली, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, तसेच अनेक काश्मिरी हिंदू उपस्थित होते.

श्री. रमेश शिवपुरी पुढे म्हणाले,

१. धर्मांधांनी हिंदूंना कमकुवत समजू नये. धर्मांधांशी हिंदू गेली १ सहस्र वर्षे लढूनही आज भारतात ८३ टक्के हिंदू आहेत. ही लढाई चालू रहाणार आहे.

२. आपल्यातील काही देशद्रोही ‘जयचंद’ हे आपल्याच देशाचे खाऊन आपल्याच देशाच्या विरोधात काही पैशांसाठी विकले गेले आहेत. अशा ‘आधुनिक जयचंद’ यांना देशातून हाकलले पाहिजे.

३. म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान असते, तर काश्मीरची समस्या राहिलीच नसती.

४. हिंदुस्थान हा देश हिंदूंचा होता, आता आहे आणि पुढेही रहाणारच !

काश्मीर ही हिंदूंची जन्मभूमी, तर महाराष्ट्र कर्मभूमी आहे ! – जगमोहन कौल

आतापर्यंत अनेक वेळा काश्मिरींवर आक्रमणे झाली; पण हिंदु धर्म संपला नाही. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनानंतरही हिंदूंना संपवण्याचे षड्यंत्र चालू असूनही हिंदू संपलेले नाहीत. ‘गर्व से कहो, हम हिंदू है ।’ हा संदेश सर्वांपर्यंत पोचवायला हवा. काश्मीर ही हिंदूंची जन्मभूमी, तर महाराष्ट्र कर्मभूमी आहे.

आपले काश्मीर मिळवण्यासाठी साधना करायला हवी ! – डॉ. अमर मालमोही

आपण संस्काराने हिंदू व्हायला पाहिजे. काश्मिरी पंडित हा आपले संस्कार, परंपरा आणि धर्म पाळणारा आहे. पनून काश्मीरमधून आपण आतापर्यंत अनेक वेळा विस्थापित झालो आहोत. काश्मिरी हिंदूंना धर्मांध मुसलमानांमुळे विस्थापित व्हावे लागले. आपल्याला आपले हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांना वाचवायचे असेल, तर काश्मीरला वाचवावे लागेल. आपले काश्मीर मिळवण्यासाठी आपण साधना करायला हवी आणि आपल्या संस्कारांनाही जपावे लागेल.

युवकांनी आपले संस्कार आणि धर्मपालन करणे आवश्यक ! – रितु सुंभली

वर्ष १९९० मध्ये धर्मांधांनी काश्मीरमध्ये जो कहर माजवला होता, तो आम्ही कधीही विसरणार नाही. आज युवकांनी संस्कारानुसार आचरण आणि धर्मपालन करणे आवश्यक आहे. ते न केल्यास एक दिवस ते इतिहासजमा होईल.

हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ अपरिहार्य ! – पराग गोखले

वर्ष १९९० च्या दशकात जे काश्मीरमधील हिंदूंसमवेत घडले, तेच आज भारतातील प्रत्येक शहरात घडत आहे. आजची निधर्मी शासनव्यवस्था हे समस्येचे मूळ आहे. सरकार हज यात्रेकरूंना सवलत देते आणि सुविधा पुरवते; परंतु आतंकवाद्यांच्या एका धमकीवरून अमरनाथ यात्रेचा कालावधी ११ दिवसांनी न्यून करते. हिंदूंवरील सातत्याने होणारे अत्याचार थांबवायचे असतील, तर निधर्मी शासनव्यवस्था हटवून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापणे अपरिहार्य आहे. त्यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन निर्माण करणे आवश्यक आहे.

हिंदु महिलांनी स्वतःतील दुर्गातत्त्व प्रकट करून स्वतःचे रक्षण स्वतः करावे ! – सौ. राजश्री तिवारी

ज्या ज्या वेळी पृथ्वीवर हिंदु महिलांवर अत्याचार झाला, त्या त्या वेळी प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन अधर्माचा नाश केला आहे. आताही हिंदु महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा वेळी हिंदु महिलांनी स्वतःतील दुर्गातत्व प्रकट करून स्वतःचे रक्षण स्वतः करावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील आपला वाटा उचलावा.

क्षणचित्रे

१. काही वक्त्यांनी काश्मिरी भाषेत मार्गदर्शन केले.

२. १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंवर जो अन्याय करण्यात आला, त्यावर आधारीत एक कविता श्री. संजय कौल यांनी सादर केली.

३. उपस्थित काश्मिरी हिंदूंमधील श्री. राजदान यांनी ‘माझे घर’ या शीर्षकाखाली कविता सादर केली.

४. कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘हुर्रियतवाल्यांनो, काश्मीर सोडा ! येथे होणार पनून काश्मीर !’ या आशयाचे फलक इंग्रजी भाषेत लावण्यात आले होते.

५. या वेळी समितीच्या वतीने काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे प्रसंग दर्शवणारे ‘फॅक्ट’निर्मित प्रदर्शन लावले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *