हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ अभियान
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासन स्वतःहून गुन्हे प्रविष्ट का करत नाही ?
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्यांवर गुन्हे प्रविष्ट करा, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांच्याकडे १७ जानेवारी या दिवशी देण्यात आले. या वेळी पेशवा युवा मंचचे गणेश लंके, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख प्रतापसिंह साळुंखे, सौरभ थिटे-पाटील, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे, विश्व हिंदु परिषदेचे रविंद्र साळे सर, रामेश्वर कोरे, विश्वनाथ मुंढेवाडीकर, बजरंग दल शहरप्रमुख सुनील बाबर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील, श्लोक पाटील यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात