जम्मू येथील सभेत ‘पनून कश्मीर’ला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदूंना आवाहन
जम्मू – इतक्या वर्षांमध्ये काश्मिरी हिंदूंच्या गंभीर स्थितीविषयी राष्ट्राने मौन धारण केल्याने दु:ख वाटते. जे काश्मिरी हिंदूंना भोगावे लागले, तेच सध्या देशाच्या विविध भागांतील हिंदूंना भोगावे लागत असल्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे आता सर्व राष्ट्राला गांभीर्याने पहावेच लागेल. इस्लामीकरणाचा कर्करोग आता राष्ट्राच्या इतर भागांतही पसरू लागला आहे. हा दुर्धर कर्करोग रोखण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पनून कश्मीर ‘एक भारत अभियान – कश्मीरकी ओर’ या माध्यमातून करत असलेला हा प्रयत्न रामबाण उपाय ठरेल, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे केले.
येथील जागतीनगरात १८ जानेवारी या दिवशी पनून कश्मीर संघटनेकडून ‘एक भारत अभियान – कश्मीरकी ओर’च्या अंतर्गत एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात गेली २७ वर्षे निर्वासित म्हणून जीवन कंठणार्या काश्मिरी हिंदूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने भाग घेतला. काश्मिरी हिंदूंसाठी वितस्ता नदीच्या उत्तर आणि दक्षिण बाजूला स्वतंत्र भूमी मिळावी, यासाठी पनून कश्मीरने २७ वर्षांपूर्वी चळवळ चालू केली आहे.
डॉ. अग्नीशेखर, संयोजक, पनून कश्मीर : काश्मीरमध्ये येणार्या भारतीय हिंदूंना फुटीरतावाद्यांनी थोपवून दाखवावे. हिंदूंचा लढा सत्यावर आधरित आहे आणि कोणतीही शक्ती त्यांना यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. काश्मीरवर काश्मिरी हिंदूंचा पहिला अधिकार आहे.
श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती : काश्मिरी हिंदूंचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे. हिंदु जनजागृती समिती भारतभरातील हिंदूंपर्यंत पनून कश्मीरचा संदेश पोेचवण्याचे कार्य करत आहे.
श्री. तपन घोष, अध्यक्ष, हिंदु संहती : फुटीरतावादी आणि देशद्रोही त्यांचे राष्ट्रविघातक सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील.
डॉ. अजय च्रोंगू : ‘राज्य सरकार तसेच केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी काश्मीरच्या समस्येवर सतत दुर्लक्षच केले. त्यासाठी आता निकडीने प्रयत्न झाले पाहिजेत. भारतभरातील हिंदु लोकांपर्यंत ‘पनून कश्मीर’चे उद्दिष्ट पोेचले आहे, त्यांच्या चळवळीला सर्वत्रकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
या वेळी प्रा. हरि ओम, डॉ. शक्ती भान, श्री. विजय टिक्कू आणि श्री. रमेश मानवटी या मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात