Menu Close

इसिसकडून सिरियातील ३०० जणांची सामूहिक हत्या !

दमास्कस (सिरिया) : इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने सिरियाच्या ३०० लोकांचे अपहरण करून त्यांची सामुहिक हत्या केली. यामध्ये स्थानिक पोलीस आणि ५० सैनिक, तसेच सैन्याचे कुटुंबीय यांचा समावेश होता. (भारतातील इसिसच्या समर्थक आतंकवाद्यांचे समुपदेशन करणार्‍या पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सिरियाच्या सैन्याने आतंकवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात ४२ आतंकवादी ठार झाले. सिरियाचे पंतप्रधान अल्-हलाकी यांनी हे भ्याड वृत्तीचे आक्रमण असल्याचे सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र्रसंघानेही अल्-जोर भागातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *