प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ
प्रत्येक वर्षी अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी का आणत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जयपूर : २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी, तसेच या संदर्भात जनतेमध्ये जागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. १८ जानेवारीला जयपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास यादव आणि जयपूरचे पोलीस आयुक्त संजय अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. बेगराज शर्मा, श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. तेजसिंह गुर्जर, श्री. ओमशंकरजी आणि श्री. मनीष शर्मा उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात