Menu Close

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करणार ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

  • गेली ३ दशके जिहादी आतंकवादामुळे भरडल्या गेलेल्या भारतातील एकातरी शासनकर्त्याने कधी असे विधान करण्याचे धाडस केले आहे का ?
  • आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे विधान करणारे आता ट्रम्प यांना धार्मिक द्वेष पसरवत आहेत, असे म्हणणार आहेत का ? ट्रम्प हे हिंदुत्वनिष्ठ नाहीत, हे तरी ते लक्षात घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

trump

वॉशिंग्टन – जिहादी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करणार, असे वचन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिकेचे ४५ वे राष्ट्रध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी हे वचन दिले आहे. आतंकवादाचा काळा चेहरा पृथ्वीवरूनच नष्ट करू, असे त्यांनी घोषित केले.

ट्रम्प म्हणाले, अमेरिकेची सत्ता आजवर वॉशिंग्टनच्या हाती होती; मात्र आजपासून ही सत्ता मी अमेरिकी नागरिक म्हणून तुमच्या हाती सोपवत आहे. येथील नोकर्‍या, संपत्ती, सुरक्षा तुम्हाला परत मिळवून देईन. अमेरिका फर्स्ट या तत्त्वावरच मी देशाचे नेतृत्व करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अमेरिकेत निर्माण होणार्‍या वस्तूंचाच आग्रह धरणार आणि अमेरिकी नागरिकांनाच सर्वप्रथम रोजगारसंधी देणार, हीच मूलभूत भूमिका असेल. काळे, गोरे असा वर्णभेद करण्याचे कारण नाही, सगळ्यांचे रक्त समानच असते, असेही ट्रम्प म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *