Menu Close

स्टार प्लस वाहिनीवरील ‘सिया के राम’ या मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन

  • ‘स्टार प्लस’ वाहिनीचा हिंदुद्वेष्टेपणा

  • हिंदु जनजागृती समितीकडून वाहिनीकडे तक्रार

नवी देहली – स्टार प्लसवरून प्रसारित करण्यात येणार्‍या ‘सिया के राम’ या दूरदर्शन मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी हिंदु जनजागृती समितीकडे आल्या आहेत. या तक्रारीविषयी आढावा घेतल्यानंतर समितीने स्टार प्लसला पत्र पाठवून सदर मालिका स्टार प्लस वाहिनीवरून काढून टाकण्याची विनंती केली आहे.

या मालिकेतील काही दृष्ये दिशाभूल करणारी आहेत आणि मूळ वाल्मिकी रामायणाशी फारकत घेणारी आहेत. रामायण आणि हिंदु धर्म यांवर निधर्मी आणि उदारमतवादी विचार थोपवण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे, तसेच प्रेक्षकांच्या मनावर चुकीचे संस्कार केले जात आहेत. या मालिकेमधून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचा दावा करण्यात येतो; मात्र प्रत्यक्षात या मालिकेतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

याविषयी हिंदु जनजागृती समितीला स्टार टीव्ही कडून काहीच प्रतिसाद लाभलेला नाही. सर्व धर्माभिमानी प्रेक्षकांनी स्टार टीव्हीशी सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून ही मालिका हटवण्याची मागणी करणे आवश्यक आहे.

धर्माभिमानी हिंदु खालील पत्यावर निषेध नोंदवत आहेत.

संपर्क : स्टार प्लस नेटवर्क
संपर्क क्रमांक : (०२२) ६६३० ५५५५, (०२२) ४९६२ ५५९०
इ-मेल : [email protected] , [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *