निपाणी – निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. यावर लगेचच सकारात्मक प्रतिसाद देत श्री. किल्लेदार यांनी हा चित्रपट आम्ही प्रदर्शित करणार नाही, असे आश्वासन देत कर्मचार्यांना सांगून त्यांनी रईसचे पोस्टरही काढून टाकले.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. विशाल हत्तरगी, भाजपचे शहरप्रमुख श्री. प्रणव मानवी, श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सागर मानकर, अमित शिंदे, श्रीराम सेनेचे शहरप्रमुख सर्वश्री श्रीनिवास चव्हाण, सागर श्रीखंडे, निवास पोवार, संभाजी राजे ग्रुपचे श्री. विकास लोकरे, बसवाननगर गणेश मंडळाचे श्री. अमित मिसाळ, रणरागिणी शाखेच्या सौ. अल्का पाटील, सौ. दीपा साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, संदीप जाधव यासंह ४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ या वेळी उपस्थित होते. (पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट प्रदर्शित न होण्यासाठी निवेदन देणार्या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! तसेच चित्रपट प्रदर्शित न होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणार्या चित्रपटगृह व्यवस्थापकांचेही अभिनंदन ! अन्यत्रच्या चित्रपटगृहचालक/मालक यांनी यातून बोध घेऊन रईसवर बहिष्कार घालावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
रईस आणि मोहल्ला अस्सी चित्रपट प्रदर्शित करू नका ! – हिंदु जनजागृती समितीचे चित्रपटगृह चालकांना निवेदन
कागल (जिल्हा कोल्हापूर) – पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस, तसेच भगवान शिव आणि श्रीक्षेत्र काशी यांचे विडंबन असलेला मोहल्ला अस्सी चित्रपट प्रदर्शित न होण्यासाठी येथे प्रेमचंद चित्रमंदिराचे चालक श्री. विजय प्रेमचंद शहा येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. या वेळी कागल शिवसेना शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका महाविद्यालय प्रमुख श्री. प्रणित कन्नूर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात