Menu Close

प्रत्येक हिंदूने स्वसंरक्षणासाठी सिद्ध असायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

अंबेलोहळ (जिल्हा संभाजीनगर) येथे फॅक्टचे प्रदर्शन

धर्माभिमानी महिला प्रदर्शन पहातांना
धर्माभिमानी महिला प्रदर्शन पहातांना

संभाजीनगर – काश्मीरमध्ये २७ वर्षांपूर्वी जे घडले, तीच परिस्थिती आज देशाच्या विविध भागांत पहायला मिळत आहे. एका रात्रीत ४ लक्ष ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात विस्थापित व्हावे लागले आणि अनेक महिलांवर बलात्कारही झाले. येणार्‍या काळात आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित रहावे, असे वाटत असेल, तर प्रत्येक हिंदूने स्वसंरक्षणासाठी सिद्ध असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. येथील अंबेलोहळ गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये १९ जानेवारी या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनदिनाच्या निमित्ताने फॅक्टचे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन धर्माभिमान्यांना दाखवल्यानंतर कु. लोणे यांनी वरील मार्गदर्शन केले. गावातील अनेक धर्माभिमानी महिला आणि पुरुष यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या वेळी उपस्थितांना पनून कश्मीरची ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली.

क्षणचित्रे

१. गावात चालणार्‍या धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमानी सर्वश्री संदीप प्रधान, नवनाथ चोरमले आणि योगेश प्रधान यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले. तसेच त्यांनी उत्स्फूर्तपणे सेवा केली.

२. हे प्रदर्शन पहाण्यासाठी महिला आणि युवती यांचा सहभाग लक्षणीय होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *