Menu Close

मुंबई येथे हिंदु महिलेचा विनयभंग आणि मारहाण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यास हिंदूंनी पोलिसांना भाग पाडले !

उद्दाम धर्मांधांना धडा शिकवणार्‍या संघटित हिंदूंचे अभिनंदन !

मुंबई – विक्रोळी पार्कसाईट येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ठिकाणी मांसाहारी जेवण बनवण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी हिंदु महिलेला १९ जानेवारीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. तिचे मंगळसूत्रही तोडले. या वेळी तिला साहाय्य करणार्‍या एका हिंदु युवकावरही धर्मांधांनी ब्लेडने वार केला. (उद्दाम धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली, तसेच हिंदूंनीही मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या ठिकाणी एकत्रित येऊन धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. (हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून धर्मांधांवर कारवाई का करत नाहीत कि तेही धर्मांधांच्या पुढे झुकतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्मांधांना अटक केल्यावर त्यांच्या समर्थनार्थ काही धर्मांधांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे एकवटलेल्या हिंदूंनी धर्मांधांवर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले. (सर्वत्रच्या हिंदूंनी धर्मरक्षणासाठी लढणार्‍या हिंदूंचा आदर्श घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी जमशेद शेख, शेहजाद, रिझवाणी (महिला) यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी धर्मांधांना २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांनाच जगणे अशक्य करणारे अल्पसंख्यांक धर्मांध आणि त्यांना पाठीशी घालणारे पोलीस ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

त्रास देणार्‍या धर्मांधांच्या विरोधात तक्रार करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून दमदाटी

येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या लगत असलेल्या पटांगणात मागील ४० वर्षांपासून प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताह, तसेच विविध सण साजरे केले जातात; मात्र मागील तीन वर्षांपासून या मंदिराच्या लगत रहाणारे धर्मांध हिंदूंच्या कार्यक्रमाच्या आधी पटांगणात चारचाकी वाहने लावणे, विनंती करूनही वाहने न हटवणे, हिंदूंना दमदाटी करणे, विनाकारण वाद घालणे अशा प्रकारे त्रास देत आहेत. याविषयी स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्यात अनेकवेळा तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट पोलिसांकडून हिंदूंनाच दमदाटी करण्यात येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *