Menu Close

एका रात्रीत नांदगावातील चार मंदिरात चोऱ्या

नाशिकमधील नांदगाव शहरातील चार मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी अंदाजे ४२ हजार रुपये लंपास केले आहेत. येवला रोडवरील मल्हारवाडी गावातील खंडेराव मंदिर, जैन धर्मशाळेसमोरील नांदेश्वर महादेव मंदिर, पांचाळ गल्लीतील हनुमान मंदीर, चांडक प्लॉटमधील श्रीराम मंदिर या चार मंदिरांमध्ये चोरट्यांनी आपला हात साफ केला.

चोरट्यांनी चार दानपेट्यातील रक्कम लांबवताना केवळ नोटाच चोरून नेल्या असून चिल्लर मात्र तशीच ठेवली आहे. यासोबतच नांदेश्वर मंदिरातील चांदीच्या वस्तूंनाही चोरट्यांनी हात लावला नाही. सकाळी पूजेसाठी गेलेल्या भाविकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले. देवराम गोविंद खैरनार यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक अरुण निकम आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन प्रकरणाचा तपास सुरू केली आहे.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *