दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत प्रतिपादन !
इंदूर (मध्यप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे इंदूरच्या दौर्यावर असतांना बंगालच्या वर्तमान स्थितीविषयी दैनिक भास्करचे प्रतिनिधी श्री. राहुल दुबे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीतील ठळक सूत्रे पुढीलप्रमाणे…
१. घुसखोरी करून आतंकवाद पसरवणे, ही केवळ जम्मू-काश्मीरची समस्या नाही. बंगालमधील मुर्शिदाबाद, मालदा आणि धूलगड येथेही हीच समस्या हातपाय पसरत आहे.
२. केंद्र आणि राज्य सरकार याकडे जितके दुर्लक्ष करील, तितकी ही समस्या अजून विक्राळ होत जाईल. तेथे धर्मांतरासाठी छळ होत आहे. घरात देवतांची चित्रे लावू दिली जात नाहीत. गुप्तचर विभाग असो कि सरकार, सर्वांना हे माहिती आहे.
३. देशाची सीमा असणार्या राज्यांत धर्मांतर आणि घुसखोरी यांच्या विरोधात सरकारने चळवळ चालवण्याची आवश्यकता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात