हा असहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नव्हे का ? वारंवार अशी कृत्ये करणार्या संघटनेवर शासनकर्ते कोणती कारवाई करणार आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संभाजीनगर : येथील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये २१ जानेवारी या दिवशी आयोजित केलेला हे राम नथुराम या नाटकाचा चालू प्रयोग उधळण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या ८ कार्यकर्त्यांनी केला; परंतु जागरूक शिवसैनिकांमुळे हा प्रयत्न फसला. (गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठवणार्या शिवसैनिकांचे अभिनंदन ! असे जागरूक शिवसैनिक सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. नाटकाचा प्रयोग चालू होताच रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संभाजी ब्रिगेडचे ८ कार्यकर्ते हा प्रयोग उधळण्यासाठी प्रवेशदारापाशी आले होते; परंतु सजग असलेल्या शिवसैनिकांनी त्या कार्यकर्त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. बंदोबस्ताला असलेले पोलीस घटनास्थळी येईपर्यंत ब्रिगेडचे कार्यकर्ते पसार झाले. या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही कह्यात घेतलेले नसल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात