Menu Close

पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांनी चालते व्हावे ! – नरेंद्र तांबोळी, शिवप्रतिष्ठान

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

नंदुरबार : मलकापूर येथे झालेल्या दंगली प्रकरणी धर्मांधांना सूत्रधारांसह त्वरित अटक करावी तसेच निरपराध हिंदूंवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि जे पाकप्रेमी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, त्यांनी येथून चालते व्हावे, अशी चेतावणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने आयोजित निदर्शनाच्या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नरेंद्र तांबोळी यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल केवळ मुसलमानांनी केली असतांनाही निरपराध हिंदूंवरच गुन्हे प्रविष्ट केले. या प्रकरणात ‘एम्आयएम्’चे नगरसेवक शहेजाद खान यांच्यावर गुन्हा प्रविष्ट असून तेही फरार आहेत. या धर्मांधांना त्वरित अटक करून कठोर शासन करावे.

शासकीय कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत प्रार्थनेची सुट्टी देण्याचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा ! – पंकज चौधरी, युवा सेना

युवा सेनेचे श्री. पंकज चौधरी म्हणाले, ‘‘प्रार्थना हे पूर्णत: वैयक्तिक साधनेचे अंग असल्याने त्यासाठी शासकीय कामकाजाच्या वेळेत सुटी देणे पूर्णतः अयोग्य आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारच्या सुटीची मागणी कोणीही केलेली नाही, मग अशा सुट्यांचा खटाटोप कशासाठी ? एकीकडे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मग शासकीय कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत प्रार्थनेची सुट्टी देण्याचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा आहे.’’

या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्ष, अखिल भारतीय महाराणा युवा मंच, रोकडेश्‍वर व्यायाम शाळा, सनातन संस्था, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनांचे ५५ हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी रिक्शाचालक आणि परिसरातील नागरिक या आंदोलनात स्वतःहून सहभागी होऊन स्वाक्षरी करत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *