जी माहिती गोरक्षकांना मिळते, ती पोलिसांना का नाही मिळत ?
गुडगाव (हरियाणा) : गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनंतर धर्मांधांच्या चारचाकी वहानातून नेण्यात येणारे ९०० किलो गोमांस पोलिसांनी पकडले. याप्रकरणी मेवात येथील रहिवासी हसन महंमद यास अटक करण्यात आली, तर अन्य दोघे जण घटनास्थळावरून फरार झाले.
१. आरोपी सॅन्ट्रो वाहनातून गोमांस घेऊन देहलीच्या दिशेने जात होते.
२. हरियाणा गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
३. त्यानंतर पोलिसांनी सोहना रस्त्यावरील टोलनाक्याजवळ वाहनांची तपासणी चालू केली.
४. त्या वेळी पोलिसांनी एका पांढर्या रंगाच्या सॅन्ट्रो कारला थांबण्यास सांगितले.
५. पोलिसांना पाहून कारचालकाने कार मागे वळवण्याचा प्रयत्न केला.
६. त्या वेळी पोलिसांनी हसन महंमद यास पकडलेे; मात्र दोघे जण फरार झाले.
७. हसनने पोलिसांना मागून येणार्या एसेंट या कारमध्ये गोमांस असल्याची माहिती दिली. यानंतर ती कार तेथे येताच पोलिसांनी ती थांबवली.
८. पोलिसांनी गाडीतून गोमांस हस्तगत केले आणि चालकाला कह्यात घेतले.
९. सर्व आरोपींवर हरियाणा गोवंश रक्षण आणि गोसंवर्धन कायदा-२०१५ आणि भा.द.वि.च्या कलम १२० अन्वये गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती सोहना पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकेश कुमार यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात