प्रयाग (उत्तरप्रदेश) : येथे माघ मेळ्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. यात गंगा नदीचे रक्षण, गोरक्षण, यांसह धर्मशिक्षणाविषयक आचारधर्म, देवतापूजन, देवालय दर्शन आदी विषयांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. तसेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आघात करणार्या घटनांचीही माहिती असणारे फलक लावण्यात आले होते. या वेळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा कक्षही लावण्यात आला होता.
क्षणचित्रे
१. श्री. त्रिलोचनप्रसाद मिश्रा, प्रयाग : सनातनची उत्पादने अत्यंत सात्त्विक आहेत. मी त्यांना घरी नेणार आहे आणि समाजात जाऊन त्यांचा प्रसार करणार आहे. याद्वारे मी धर्मसेवा करणार आहे.
२. श्री. पी.के. द्वीवेदी, प्रयाग : मी गेल्यावर्षी सनातनच्या प्रदर्शनातून ग्रंथ घेतला होता. मी आतापर्यंत अनेक ग्रंथ वाचले आहेत; मात्र सनातनच्या ग्रंथाप्रमाणे एकही ग्रंथ बनलेला नाही.
३. गेल्यावर्षी प्रदर्शनातून ज्यांनी सात्त्विक उत्पादने घेतली होती, ते प्रदर्शन शोधत येथे पोचले. त्यांना प्रदर्शन सापडल्यावर आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
४. गेल्या वर्षी ज्यांनी ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतले होते, ते यावर्षी स्वतःच जिज्ञासूंना त्यांचे महत्त्व सांगत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात