Menu Close

खार (मुंबई) : हिंदु महिलेची छेड काढणार्‍या धर्मांधाचा मृत्यू झाल्याचा सूड म्हणून धर्मांधांकडून ३ हिंदूंना अमानुष मारहाण, एका हिंदूचा मृत्यू !

हिंदू संघटित असते, तर हिंदुबहुल देशात त्यांना धर्मांधांचे अत्याचार सहन करावे लागले असते का ? 

मुंबई : येथील खारमधील गोळीबार वसाहतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदु-मुसलमानांमध्ये तणावाचे वातावरण आहे. धर्मांध काही ना काही कारण काढून हिंदूंना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. एका विवाहित हिंदु महिलेला दोन वर्षांपासून तेथील एक कुख्यात धर्मांध गुंड आणि त्याचे मित्र अश्‍लील शेरेबाजी करून अनेक वर्षांपासून त्रास देत होते. या विरोधात खार येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात त्या हिंदु कुटुंबाने अनेक तक्रारीही प्रविष्ट केल्या; मात्र पोलिसांनी त्यावर गांभीर्याने कठोर कारवाई केली नाही.

२१ डिसेंबर २०१५ या दिवशी तो धर्मांध पुन्हा हिंदु महिलेची छेडछाड करून तिला त्रास देऊ लागला. त्या वेळी त्या महिलेचे पती अजिंक्य यांनी पोलिसांना दूरध्वनी करून तक्रार केली. त्या वेळी पोलिसांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करा, असे सांगितले. (असे उत्तर अन्य धर्मियांना देण्याचे धाडस पोलिसांचे झाले असते का ? संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्या वेळी त्या महिलेची सासू आणि दीर पोलिसात तक्रार द्यायला गेले. नंतर अजिंक्य आणि धर्मांध यांच्यात कडाक्याचे भांडण चालू झाले अन् दोघांतील झटापटीत चाकू लागल्याने त्या धर्मांधाचा मृत्यू झाला. त्यानंतर अजिंक्य यांनी स्वतः पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केले.

या घटनेचा राग मनात धरत परिसरातील अनेक धर्मांधांनी त्या हिंदु कुटुंबाच्या घरावर आक्रमण करत घरातील साहित्याची तोडफोड केली. एकही वस्तू घरात शिल्लक ठेवली नाही. घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि ३५ सहस्त्र रुपये यांची धर्मांधांनी चोरी केली. या वेळी धर्मांधांना अटकाव न करता पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

दुसर्‍या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर या दिवशी अजिंक्य यांच्या जवळच्या तीन हिंदु मित्रांचा या घटनेशी कुठलाही संबंध नसतांना ते केवळ त्याचे मित्र आहेत; म्हणून धर्मांधांनी अमानुषपणे त्यांच्या हाता-पायाची बोटे ठेचून आणि तीक्ष्ण ब्लेडने गाल कापून त्यांना गंभीर घायाळ केले. त्या तिघांपैकी विकास कांबळे यांचा काही दिवसांनंतर उपचाराच्या वेळी मृत्य झाला, तर दोन जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

धर्मांधांना पाठीशी घालण्यासाठी पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

(धर्मांधांची दाढी कुरवाळत हिंदूंची मुस्कटदाबी करणारे हे पोलीस भारताचे कि पाकचे ? –  संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. सदर परिसर मुसलमानबहुल असल्यामुळे अजिंक्य यांच्या कुटुंबियांवर तसेच ओळखीच्यांवर कधीही पुन्हा आक्रमण होऊ शकते. त्यामुळे त्या हिंदु कुटुंबाला २१ डिसेंबर २०१५ पासून स्वतःचे घर सोडून अन्य ठिकाणी रहावे लागत आहे. पोलिसांनी या घरफोडीच्या विरोधात संबंधित धर्मांधांच्या विरोधात अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. घराबाहेर पडलेले साहित्य घरात आणून ठेवून घराला टाळे लावले आहे आणि काही झालेच नाही, असे पोलीस भासवत आहेत.

२. मृत पावलेला धर्मांध गुंड हा अनेक गुन्हेगारी आणि मादक पदार्थांच्या व्यवसायामध्ये गुंतलेला होता. तसेच तो नेहमी मद्यप्राशन करून परिसरातील लोकांना त्रास द्यायचा; मात्र ही पार्श्‍वभूमी माहीत असूनही पोलिसांनी त्याच्याशी अर्थपूर्ण व्यवहार चालू ठेवले होते आणि त्याच्यावर तसेच त्याच्या सहकार्यांवर कठोर कारवाई केली नाही.

३. अजिंक्य यांच्या तीन मित्रांना झालेल्या मारहाणीविषयी पोलिसांनी उत्तरदायी धर्मांधांच्या विरोधात साधी तक्रारही दाखल केली नव्हती. त्यातील विकास कांबळे याचा मृत्यू झाल्यावर १०० हिंदूंचा गट त्यांचा मृतदेह निर्मलनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. जोपर्यंत धर्मांधांना अटक होत नाही, तोपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका हिंदूंनी घेतली. त्या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दोषींना अटक केली आहे आणि जे फरार आहेत, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

४. प्रत्यक्षात एकालाही अटक करण्यात आलेली नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी त्या मृत पावलेल्या हिंदूंचा (विकास कांबळे यांचा) श्‍वसननलिकेमध्ये अन्नाचा कण अडकल्याने मृत्यू झाल्याची नोंद केली होती. अशी नोंद सिद्ध झाल्यावर त्यावर उपस्थित हिंदूंच्या सह्या घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता; मात्र हिंदूंनी नकार दिला. त्यावर या गुन्ह्यात हिंदूंना अडकवण्याची धमकी देण्यात आली.

५. दोन गंभीर घायाळ झालेल्या हिंदूंनी मृत्यू पावलेल्या विकास कांबळे यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांची नावे पोलिसांना सांगितली. त्या वेळी पोलिसांनी ती नावे लिहून घेतली आणि थोड्या वेळाने त्या कागदावर आणखीन काही हिंदु मुलांची नावेही स्वतःहून घातली आणि त्या कागदावर त्या दोघांना स्वाक्षरी करण्यास सांगितले; परंतु त्या दोघांनी हिंदु मुलांची नावे पाहून त्या कागदावर (जबानीवर) स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

६. अजिंक्य यांचा लहान भाऊ २१ डिसेंबरपासून गायब आहे. धर्मांध सातत्याने लहान भावाला मारण्याची धमकी देत असल्याचे अजिंक्य यांच्या आईने सांगितले.

७. ही बातमी स्थानिक वार्ताहरांना समजल्यावर त्यासंदर्भात त्यांनी स्थानिक पोलीस निरीक्षकांना संपर्क साधला. अजिंक्य यांच्या पत्नीचे आणि त्या धर्मांधाचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे अजिंक्यने धर्मांधाची हत्या केली, असे पत्रकारांना सांगून पोलिसांनी हिंदु महिलेचे चारित्र्यहनन केले.

८. गोळीबार परिसरात धर्मांधांकडून अनैतिक व्यवसाय चालतो. सूत्रांच्या माहितीनुसार त्या व्यवसायाच्या मोबदल्यात पोलिसांना मोठी लाच मिळते. त्यामुळे पोलीस धर्मांधांच्या विरोधात कारवाई करत नाहीत, असे स्थानिक सूत्रांकडून समजले.

९. हिंदूंचे गणेशोत्सव आणि नवत्रोत्सव आदी उत्सव आल्यावर धर्मांध देवतांच्या मूर्तीवर हाडे-मांस टाकून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करतात. या विरोधात तक्रार करूनही पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. उलट हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न करतात.

१०. तेथील धर्मांधांच्या इमारतीमध्ये असलेल्या एका अनधिकृत मशिदीत भोंगे लावून त्यावरून कर्णकर्कश आवाजात प्रार्थना म्हणण्यात येते. याचा स्थानिक हिंदूंना त्रास होतो. त्या विरोधात हिंदूंनी तक्रार केल्यावर अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याऐवजी उलट त्या मशिदीलाच दोन पोलिसांचे संरक्षण देण्यात आले. मशिदीच्या विरोधात तक्रार करणार्‍या हिंदूलाच वारंवार वेळी-अवेळी पोलीस ठाण्यात बोलावणे, बराच वेळ बसवून ठेवणे, अशा प्रकारे छळण्याचा प्रकार पोलीस करतात.
११. येथे धर्मांधांची प्रचंड दहशत असनू राजकीय पक्षही हिंदूंची बाजू घेण्यासाठी पुढे येत नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *