ठाणे : याविषयीचे निवेदन ठाण्याच्या जिल्हाधिकार्यांना देण्यात आले होते. याची नोंद घेत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्रक काढून जनतेला आवाहन केले आहे. या पत्रकात नमूद केले आहे की, गृह विभागाने १ जानेवारी २०१५ च्या परिपत्रकानुसार याविषयी काही सूचना दिल्या आहेत. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराविषयी तरतूद केलेली आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपडे यांमध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. ते सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालय यांमध्ये वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली नष्ट करावेत. ते पूर्णपणे जळून नष्ट होईपर्यंत ती जागा सोडू नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात