पालघर जिल्ह्यातील एम्.एन्. दांडेकर विद्यालय आणि आणि जिल्हा परिषद शाळा क्र. १ या शाळांमध्ये क्रांतिकारकांच्या राष्ट्रकार्याची माहिती करून देणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. दोन्ही शाळांतील ८०० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. जिल्ह्यातील वेवूर, नवली, सातपाटी, टेंभोंडे, धनसार आणि शिरगांव येथील सहा जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासा’च्या सौ. जयश्री अहिरराव यांनी घेतलेल्या व्याख्यानांचा लाभ सर्व शाळांतील एकूण १ सहस्र ८०० विद्यार्थ्यांनी घेतला.
बारामती येथे विद्यार्थ्यांचे प्रबोधन !
येथील शाहू हायस्कूलमधील ७०० विद्यार्थी आणि २० शिक्षक यांचे २१ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीन सौ. प्राजक्ता सांगळुदकर आणि श्री. दिनेश नायक यांनी प्रबोधन केले.
विशेष !
आदल्या दिवशी समितीच्या वतीने या शाळेत निवेदन दिल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी ‘‘विद्यार्थ्यांसमोर विषय मांडा’’, असे स्वत:हून सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात