-
हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळीचे यश
-
पुणे उपजिल्हाधिकार्यांचे आदेश
पुणे : राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यपालांच्या आदेशानुसार २२ ऑगस्ट २००७ या दिवशी परिपत्रक काढले होते. त्यानुसार शासनाचे संबंधित अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी यांना राष्ट्रध्वजाचा मान राखणे अन् प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरणे, यांसाठी आदेशवजा आवाहन केले होते. या परिपत्रकाप्रमाणे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदारांना भेटून पुणे जिल्हाधिकार्यांच्या नावे २० जानेवारीला निवेदन दिले होते. त्याची नोंद घेत पुणे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आणि करमणूक कर शाखेचे शाखाधिकारी यांना २४ जानेवारी या दिवशी दिलेल्या आदेशात ‘पुणे जिल्ह्यातील शाळांमधून व्याख्याने घेणेे आणि चित्रपटगृहांमध्ये प्रबोधनात्मक चित्रफीत दाखवणे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीला सहकार्य करावे’, असे म्हटले आहे.
आदेशात म्हटले आहे की,
१. राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी शाळांमधून मुलांचे प्रबोधन करावे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, पटांगणामध्ये पडलेले आणि रस्त्यावर इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करावेत. त्यानंतर ते महसूल यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात यावेत.
२. प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यासाठी जनजागृती करावी आणि त्याच्या वापरास प्रतिबंध करावा.
३. समितीस राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शाळांमध्ये हस्तपत्रके आणि प्रश्नमंजुषा घेण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. समितीने बनवलेली ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यास पुणे जिल्ह्यातील चित्रपटगृहे आणि केबल ऑपरेटर्स यांनी सहकार्य करावे.
गटशिक्षणाधिकारी आणि स्थानिक केबल वाहिनी यांना शासनाच्या संबंधित विभागांकडून आदेश
पुणे जिल्हा परिषद उपमुख्याधिकार्यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावरील व्याख्यान आणि प्रश्नमंजूषा घेणे अन् हस्तपत्रके वितरण करणे, याला सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच करमणूक कर अधिकार्यांकडून जिल्ह्यातील स्थानिक प्रमुख २० केबल वाहिन्यांना समितीकृत विशेष ध्वनीचित्रफीत दाखवण्यासाठी सहकार्य करावे.
जे आज हिंदु जनजागृती समिती करत आहे, ते सरकारने स्वतः करणे अपेक्षित आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात