Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ अभियान !

राष्ट्रध्वजाचा अवमान होणे

राष्ट्रदिनानंतर राष्ट्राची अस्मिता असलेले कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्र्र्रध्वज रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजाची विटंबना पाहावी लागते. कुठल्याही राष्ट्रप्रेमी नागरिकाच्या राष्ट्रभावना दुखावणारेच आहे !

अभियानाचा उद्देश

जनमानसात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी आदर निर्माण होऊन देशप्रेमाची भावना रुजवणे

अभियानाचे स्वरूप

१. शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी  प्रबोधन.

२. इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ध्वजसंहितेत सांगितल्याप्रमाणे त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्याविषयी अवगत करणे.

३. प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर निर्बंध आणण्याविषयी पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देणे.

आतापर्यंत १३ वर्षे राबवलेल्या अभियानाचा परिणाम आणि यश !

राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका २०११ मध्ये प्रविष्ट केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्या’साठी शासनाला आदेश दिला आणि त्यानंतर केंद्रीय आणि राज्य गृहाविभाग तसेच शिक्षण विभाग यांनी तसे परिपत्रक ही काढले. भिवंडी (जिल्हा ठाणे) आणि जळगाव या ठिकाणी अशी कृती समिती स्थापण्यात आली असून त्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेतले आहे. वणी (यवमाळ) येथे विद्यार्थ्यांच्या मिरवणुकांमधून राष्ट्रध्वजाची विटंबना होण्याचे प्रमाण अल्प झाल्याचे लक्षात येत आहे.

निवेदनाद्वारे केलेली मागणी

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही व्हावी !

निवेदने

जळगाव : निवासी उपजिल्ह्याधिकारी, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी नागरिकही उपस्थित होते.

ठाणे व पालघर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

मुंबई : खेरवाडी पोलीस ठाणे, तसेच मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांसह स्वामी समर्थ संप्रदायाचे श्री. संतोष पाताडे उपस्थित होते. मुलुंड येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजाराम व्हनमारे, तहसीलदार डॉ. संदीप माने यांना निवेदन देण्यात आले.

अकोला : येथील उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

वणी (यवतमाळ) : येथील उपविभागीय अधिकार्‍यांना, तसेच पोलीस ठाण्यातील अंमलदार यांना निवेदन देण्यात आले.

शिरवळ (जिल्हा सातारा) : ठाणे अंमलदार एस्.आर्. जगताप यांना निवेदन दिले. या वेळी शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सागर जरांडे, सूरज चव्हाण, स्वप्नील अडसूळ, चिराल चव्हाण, धर्माभिमानी सर्वश्री सूरज राऊत, विशाल राऊत, कु. आदित्य राऊत आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर : येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी आणि पोलीस आयुुक्त कार्यालय येथे निवेदने देण्यात आली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांसह संदीप ढगे, यश क्षीरसागर, सोमशेखर पासकंटी, चंद्रकांत साळुंके, श्रीनिवास एकलदेवी आदी राष्ट्राभिमानी उपस्थित होते.

धाराशिव (जिल्हा सोलापूर) : उपजिल्हाधिकारी श्री. सुनील यादव, तसेच जिल्हा परिषदेच्या (प्राथमिक) उपशिक्षणाधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार यांना निवेदन दिले.

बार्शी (जिल्हा सोलापूर) : येथील तहसीलदार श्री. ऋषीकेत शेळके यांना निवेदन दिले. येथील ३१ शाळा-महाविद्यालये यांमध्ये निवेदने दिली.

विशेष उल्लेखनीय !

सकारात्मक प्रतिसाद देऊन कृतीचे आश्‍वासन दिलेले प्रशासकीय अधिकारी !

१. ठाणे जिल्हाधिकारी श्री. महेंद्र कल्याणकर : यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक ही केले आणि निवेदनाची दखल घेत त्यांच्या सहकार्‍यांना पुढे सूचना देण्यास सांगितले.

२. श्री. राजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलीस ठाणे : तुम्ही राबवत असलेली चळवळ स्तुत्य असून आम्ही प्लास्टिकचे ध्वज विकणार्‍यांचे प्रबोधन करू अन्यथा त्यांच्यावर कारवाईसुद्धा करू !

३. श्री. दीपेंद्रसिंग कुशवाह, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर : न्यायालयाच्या आदेशानुसार या विषयाच्या संदर्भात एका समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी करून घेण्याविषयी आम्ही प्रयत्न करू.

४. विरेश प्रभू, ग्रामीण पोलीस अधीक्षक, सोलापूर : कुठेही असे अपप्रकार दिसल्यास आम्हाला कळवा, आम्ही त्वरित कारवाई करू !

५. श्री. सुनील यादव, उपजिल्हाधिकारी, धाराशिव : यांनी त्वरित जिल्हा माहिती अधिकारी (धाराशिव) यांना दूरध्वनी करून या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढण्याविषयी सूचना दिल्या.

६. श्रीमती रोहिणी कुंभार, (प्राथमिक) उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव : यांनी जिल्हापरिषदेच्या अंतर्गत सर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना योग्य ती काळजी घेण्याविषयी पत्रक काढण्याचे आश्‍वासन दिले.

७. श्री. ऋषीकेत शेळके, तहसीलदार, बार्शी : समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्‍यांना नोटिसा देऊ. राष्ट्रध्वजांची विक्री करणार्‍या दुकानांची नावे लिहून, त्यावर त्वरित कारवाई करू !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *